आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात दिवसभर उष्मा; रात्री मात्र हुडहुडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - फायलिन चक्रीवादळामुळे दहा-बारा दिवस मुक्काम वाढलेला मान्सून संपल्यानंतर आता थंडीची चाहूल लागली आहे. सहा दिवसांपूर्वी 21.5 अंश सेल्सिअस असलेले किमान तपमान मंगळवारी 14.6 अंशांपर्यंत घसरले. सात अंशांनी पडलेला हा फरक थंडीच्या आगमनाची वर्दी देणारा असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेस कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता वाढली असून, तो तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ आहे. त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने काही ठिकाणी ईशान्य मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, मोसमी पाऊस पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळेच सध्या दिवस आणि रात्रीच्या तपमानातील तफावत निम्म्यावर आली आहे. दिवसाचे तपमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने सध्या उकाडा जाणवत आहे.