आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही स्वार्थी नेत्यांमुळेच राजकारण झालेय कलुषित, सुनील चिंचोलकर प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शिव-समर्थभेट यावर लिहिलेल्या कवितांवर मार्मिक पद्धतीने माहिती देत श्री समर्थ रामदास स्वामींचे चरित्र आजही प्रेरणादायी आहे. राजकारण हे पवित्र क्षेत्र असून, आजच्या धूर्त स्वार्थी राजकीय नेत्यांनी या क्षेत्राला कलुषित केल्याचे मत पुणे येथील प्रवचनकार सुनील चिंचोलकर यांनी येथे व्यक्त केले

कापड बाजार येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्ट संचालित नवरात्रोत्सवनिमित्त ब्रह्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मोत्सवात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी (दि. २७) चिंचोलकर यांनी "श्री समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र कार्य' या विषयावर आपले विचार व्यक्त केले. या वेळी सुधीर पैठणकर, दिलीप काळे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. समर्थ रामदासांच्या आदर्श चरित्राचा अभ्यास करून त्यांच्यातील गुण आत्मसात करण्याची गरज अाहे. नीतिमूल्ये घसरल्याने आजची पिढी दिशाहीन होत आहे. त्यामुळे थोर संतांच्या कार्याच्या माहितीचा प्रसार करण्याची गरज आहे. राजकारण हे चांगले क्षेत्र क्षेत्र बदनाम झाले आहे. त्यामुळे समाजकारणाला दिशा देणाऱ्या राजकारणाचे पावित्र्य राखण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.