आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - येथील महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीतील अधीक्षक सुनील फुलारी यांच्यासह ग्रामीण पोलिस मुख्यालयातील सहायक उपनिरीक्षक माधव गोसावी यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल शुक्रवारी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले.
1992 मध्ये पोलिस उपअधीक्षकपदी रुजू झालेल्या फुलारी यांनी गडचिरोली, नागपूर, पुणे येथे गुन्हे शाखा उपायुक्त, सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे शाखेत कामाचा ठसा उमटविला आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयात दोन वर्षे उपायुक्त (मुख्यालय) म्हणून ते कार्यरत होते. गेल्याच वर्षी त्यांची महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत अधीक्षकपदी नियुक्ती झाली. गडचिरोलीतील एटापल्ली येथे त्यांनी नक्षलवाद्यांशी केलेल्या संघर्षाची शासनाकडूनही दखल घेण्यात आली होती. त्यांना आतापर्यंत विशेष सेवापदक, पोलिस महासंचालकांचे गौरवचिन्ह प्राप्त झाले आहे. आडगावच्या ग्रामीण पोलिस मुख्यालयातील अपर पोलिस अधीक्षकांच्या वाचक शाखेतील सहायक उपनिरीक्षक माधव काशीगीर गोसावी यांनाही 33 वर्षांच्या सेवेत 137 पदके मिळाली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.