आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनीता विल्यम्सचा नाशिक भेटीचा मानस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नुकत्याच मुंबईत आलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्याशी नाशिकच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी भेट घेऊन आगामी काळात नाशिकचा दौरा करण्याची विनंती केली. त्यावर भारतातील लहान शहरांतही स्पेस एज्युकेशन पोहोचले पाहिजे, असे सांगत सुनीता यांनी हे निमंत्रण स्वीकारले.

नासातले अनुभव, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधील क्युपोला मोड्यूलमधून पृथ्वी पाहण्याचा बेस्ट मोमेन्ट कोणता होता, असा प्रश्न अपूर्वा यांनी विचारला. यावर सुनीता म्हणाल्या, क्युपोलामधून पृथ्वीचा एक व्ह्यू मिळतो. या व्ह्यूमधून उत्तर ध्रुवावर दिसलेले अरोरा बोरेलिस हे हिरव्या रंगाचे लाइट्स दिसले आणि मला अत्यंत आनंद झाला. अरोरा बोरेलिस पाहण्याचा अनुभव संस्मरणीय होता ,असे त्या म्हणाल्या. नव्या पिढीतील शास्त्रज्ञ व अभियंत्यांना काय सांगाल, या प्रश्नावर सुनीता यांनी तरुणांनी आपल्या आदर्श व्यक्तीच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला. तसेच कल्पना चावलाचीही आठवण करून दिली.

स्वप्नपूर्तीचा योग
रॉबर्ट हूट गिब्सन व एडवर्ड एड बकबी या अंतराळवीरांशी भेटीचा योग मला आला होता. मात्र सुनीता विल्यम्स यांची भेट म्हणजे माझ्यासाठी खरोखरीच स्वप्नपूर्तीचा क्षण होता.
अपूर्वा जाखडी, स्पेस एज्युकेटर, नाशिक