आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी-पुरवठा फरकाने सराफांची झाली कोंडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सोन्याचे भाव आठवडाभरात 3400 रुपयांनी घसरल्याने ग्राहक आनंदी असला तरी छोट्या सराफी व्यावसायिकांना व्यवसाय करणे मात्र मुश्कील होत आहे. चढ्या भावाने खरेदी आणि कमी भावातील विक्रीमुळे अनेक सराफी व्यावसायिक कोंडीत सापडले आहेत. दुसरीकडे, मागणी आणि पुरवठ्यातील मोठ्या तफावतीमुळे सराफांची कोंडी झाली आहे. पुरवठादारांना ठोक सोने पोहोचविण्यास होणारा उशीर याचाही सामना काहींना करावा लागत आहे.


पुरवठा कमी
शहरातील बहुतांश छोटे सराफी व्यावसायिक मुंबईतील ठोक विक्रेत्यांकडून सोने खरेदी करतात. पण, भाव घसरल्याने ठोक विक्रेत्यांकडून पुरेसे सोने उपलब्ध होत नाही.
नारायण नागरे, संचालक, नागरे सराफ


यामुळे कोंडी
11 एप्रिलचा गुढीपाडवा, 18 एप्रिलला येणारा गुरुपुष्यामृत, 27 एप्रिलपासूनची लग्नसराई आणि मेमधील अक्षय्य तृतीया हे सुवर्णखरेदीचे लागोपाठ आलेले मुहूर्त कॅश करण्यासाठी सर्वच पेढ्यांकडून 29,000 रुपये तोळा भावाने ठोक विक्रेत्यांकडून मोठी खरेदी झाली. मात्र, सोन्याचे भाव दैनंदिन घटत असल्याचा फटका रोजच्या उलाढालीस बसत आहे.


तफावतही कारण
मुंबईतील थोड्या संस्थाच ठोक सोने विक्री करतात. मात्र, भाव कमी होण्याच्या गतीनेच मागणीतही वाढ होत आहे. सोन्याचा साठा भरपूर आहे; पण वाढत्या मागणीने डिलेव्हरी देण्याचा कालावधी मात्र वाढला आहे.
महेश आडगावकर,
आडगावकर सराफ प्रा. लि.


मुश्किलीने मिळतेय सोने
छोट्या व्यावसायिकांना अगदी 5- 10 ग्रॅम सोनेही मोठ्या मुश्किलीने मिळत आहे. दरातील घसरणीने व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे.
रमेश दुसाने, रोहन अलंकार