आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर मुख्यमंत्र्यांना अाम्ही घराबाहेर पडू देणार नाही : खासदार सुप्रिया सुळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘काेपर्डी अत्याचार प्रकरणातील अाराेपींविराेधात एक महिन्यात अाराेपपत्र दाखल करू, असे अाश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना घटनेला तीन महिने उलटले तरी अद्याप अाराेपपत्र दाखल करणे शक्य झाले नाही. त्यामुळे जनतेला खाेटी अाश्वासने देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी नाशिकमध्ये केली. तसेच येत्या दाेन दिवसांत याप्रकरणी अाराेपपत्र दाखल न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाहीत, असा इशाराही सुळे यांनी पत्रकारांशी बाेलताना दिला.

१३ जुलै रोजी नगर जिल्ह्यातील काेपर्डी गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात अाला हाेता. याप्रकरणी पाेलिसांनी तीन संशयितांना अटक केली अाहे. या घटनेनंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत अाहेत. तेव्हा हा खटला जलदगती न्यायालयासमाेर चालविण्याबराेबरच एका महिन्यात अाराेपपत्र दाखल करण्याची घाेषणा मुख्यमंत्र्यांनी केली हाेती. मात्र, तीन महिने हाेत अाले तरी अाराेपपत्र दाखल झालेले नाही, याकडे खासदार सुळे यांनी लक्ष वेधले. ‘तीन महिने हाेत अाले तरी अाराेपपत्र दाखल न झाल्यामुळे अाराेपींना जामीन मिळण्याची शक्यता अाहे. त्यामुळे सरकारने तातडीने पावले उचलत दाेन दिवसांत अाराेपपत्र दाखल करावे. काेपर्डी प्रकरणावरून राज्यात एवढा असंताेष उफाळून अाला असताना सरकार शेवटच्या तारखेची कसली वाट पाहत अाहे?’ असा प्रश्नही सुळे यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांसाठी सरकारकडे वेळ नाही : ‘कॉमेडी शो’मधल्या कपिल शर्मासाठी ट्विट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज्यात अडचणीत असलेल्या कांदा उत्पादकांसाठी मात्र वेळ नाही. काळ्या मातीशी इमान ठेवणाऱ्यांशी सरकार गद्दारी करतंय. या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी सटाण्यात (जि. नाशिक) अायाेजित कांदा परिषदेत गुरुवारी केली. राज्यातील कांदा उत्पादकांचे प्रश्न साेडविण्यासाठी शेतकऱ्यांसह अापण केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुपाेषणप्रश्नी उत्तर देताना ‘मुलं मेली तरी चालतील,’ असे बेजबाबदार वक्तव्य करणारे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना तातडीने घरी पाठवावे, अशी मागणीही सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केली.

माेदी विसरले अाश्वासन
वादग्रस्त व्यंगचित्रावरून गदाराेळ झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माफी मागितली अाहे. मात्र, राज्यातील महिलांचा त्यांनी अपमान केलाय. पुन्हा अशी चूक केली तर जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशाराही खासदार सुळे यांनी शिवसेनेला दिला. शेतीच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के हमी भाव देऊ हे निवडणुकीपूर्वी दिलेले अाश्वासन पंतप्रधान नरेंद्र माेदी अाता विसरले अाहेत. मात्र, जाेपर्यंत सर्व शेतमालाला याेग्य हमीभाव मिळत नाही ताेपर्यंत अाम्ही सरकारला साेडणार नाही,’ असा इशाराही त्यांनी कांदा परिषदेत बाेलताना दिला.
बातम्या आणखी आहेत...