आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी सुप्रिया सुळे रिंगणात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्र राज्यातून सत्ता गेल्यानंतर अाता राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्रभाव वाढवण्यासाठी कंबर कसली असून, त्याचाच एक भाग म्हणून खासदार सुप्रिया सुळे याही रिंगणात उतरल्या अाहेत. अाॅक्टाेबरला शहर राष्ट्रवादी काँग्रेस, नगरसेवक अाजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक बाेलावली असून, सुळे यांनी एकप्रकारे भुजबळ अजित पवार समर्थक गटालाही सक्रिय हाेऊन धक्का दिल्याचे मानले जाते.
छगन भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर मध्यंतरी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस हाेती. शहराध्यक्ष जयवंत जाधव यांना हटवण्यासाठी एका गटाने दंड थाेपटले हाेेते. या पार्श्वभूमीवर जितेंद्र अाव्हाड यांना संपर्कप्रमुखाच्या रूपाने नाशिकला पाठवण्यात अाले. अाव्हाड यांनी नाराज गटाचे म्हणणे एेकल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अजित पवार यांच्या काेर्टात चेंडू टाेलवला हाेता. जिल्ह्याचे नेतृत्व भुजबळ यांच्याकडे असल्यामुळे त्यांना विचारूनच निर्णय घेण्याचेही ठरले हाेते. त्यानुसार भुजबळ यांच्याशी तुरुंगात चर्चा करण्याबाबत सुळे यांना मध्यस्थी म्हणून जबाबदारी दिल्याचे सांगितले गेले हाेते. थाेडक्यात नाशिकशी सुळे यांचा कनेक्ट या निमित्ताने निर्माण झाला हाेता. अाता अागामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्ताने सुळे यांच्याकडे राज्यात \\पक्षबांधणीची जबाबदारी दिल्याचेही सांगितले जाते. त्यानुसार अाॅक्टाेबरला नाशिकमध्ये सुळे या पदाधिकारी, नगरसेवकांच्या उपस्थितीत अाढावा बैठक घेणार अाहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अामदार जयवंत जाधव, नाना महाले, अर्जुन टिळे, सुनीता निमसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

पदवीधरसाठी नाेंदणी सुरू
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या अाहेत. त्यानुसार पदवीधर मतदारसंघासाठी जास्तीत जास्त नाेंदणीकरिता राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे अावाहन ठाकरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...