आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमधील सुरेखा खैरनार खूनप्रकरणी दोन संशयित ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कॉलेजरोडवरील सुरेखा खैरनार या महिलेच्या खूनप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. वणी पोलिसांनी या दोघांना गावठी पिस्तुलासह अटक केली होती. सरकारवाडा पोलिस या दोघांना चौकशीसाठी आणणार आहेत.

ओझरखेड धरणावर एका हॉटेलमध्ये सोमवारी (दि. 13)पिस्तूल काढून दहशत निर्माण करणारे अनामिक दिनकर वाळके व स्वप्निल निवृत्ती रणमाळे (रा. दत्तनगर) या दोघांना नागरिकांनी बेदम चोप देत वणी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. सुरेखा खैरनार यांच्या खूनप्रकरणात या संशयितांचा सहभाग आहे याचा तपास करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितले.