आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीन फसवणूक प्रकरणी सुरेश वाडकरांना मिळाला दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भूखंड फसवणूक प्रकरणी चुकीची नोंद रद्द करण्याचा आदेश देत जिल्हाधिका-यांनी गायक सुरेश वाडकर यांना दिलासा दिला आहे. देवळाली येथील सर्वे नंबर 7-13-अ या मुख्त्यार पत्र केलेल्या भूखंडात त्यांची फसवणूक झाली होती.


देवळाली येथील 6600 चौरस मीटरच्या वादग्रस्त भूखंडाच्या सुनावणीत न्यायालयाने 1 ऑक्टोबर 2007 रोजी दिलेल्या आदेशात अटी-शर्तीचे पालन झाले नसल्याने, वाडकर यांचे अपील मान्य करण्यात आले होते. या भूखंडावर आरक्षण होते. त्यामुळे त्याच्या खरेदी-विक्री व्यवहारात सक्षम अधिका-यांची परवानगी घेणे आवश्यक होती. ती घेण्यात आली नाही. तसेच भूखंडाच्या व्यवहारात ठरल्यानुसार तीन महिन्यांत खरेदीखत झाले नव्हते. त्यामुळेच 21266 ही नोंद रद्द करण्यात आली. याबाबत वाडकर यांनी 22 फेब्रुवारी 2008 रोजी केलेली तक्रार प्रांतांनी फेटाळली होती. त्यामुळे त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.