आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत वैद्य फाउंडेशन- नापास झालात, कमी गुण मिळाले, तरीही चिंता नको

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दहावी-बारावीच्यापरीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाही किंवा अगदी नापास झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना आता चिंता करण्याची गरज नाही. केवळ फोनद्वारे संपर्क साधत संस्थेच्या प्रतिनिधींजवळ आपली समस्या सांगून करिअरबरोबरच इतरही समस्यांवर मार्ग काढण्याची सुविधा सुशांत वैद्य रिसर्च फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने मोफत उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेतील अपयशामुळे अजिबात खचून जाता आपले भविष्य घडविण्यासाठी या समुपदेशन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेत अपयश आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य येते.
त्यातून आपले जीवन संपविल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. परंतु, केवळ एका परीक्षेत आलेल्या अपयशाने खचून जाता करिअर घडविण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत, असे जाणकार समुपदेशक नेहमीच सांगत आले आहेत. शिवाय, दहावी किंवा बारावी ही जीवनातली अंतिम परीक्षा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठलाही टोकाचा मार्ग अवलंबिता प्रथम सुशांत वैद्य फाउंडेशनच्या तज्ज्ञांशी संपर्क साधल्यास लागलीच आपल्या अडचणींवर पर्याय उपलब्ध होतील.
दहावी-बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात भविष्यामध्ये चांगल्या करिअरसाठी नेमके काय करावे, याबाबतही संभ्रमच असतो. मोठ्या संख्येने पालकही योग्य निर्णय घेण्यात कमी पडताना दिसतात. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या गुणांच्या आधारे कुठले क्षेत्र आपल्यासाठी उत्तम आहे, याचेही मार्गदर्शन संस्थेतर्फे तज्ज्ञांच्या माध्यमातून दिले जाईल. त्याचबरोबर नापास झालेल्यांनी काय करावे, याबाबतही मार्गदर्शन केले जाणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मृणाल भारद्वाज आणि सचिव प्राचार्य डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज यांनी सांगितले.
चाचण्या करण्याचीही सुविधा
आपण निवडलेले क्षेत्र योग्य की अयोग्य, त्याचा अभ्यास झेपेल की नाही, याची आताच खात्री करण्यासाठी अॅप्टिट्यूड टेस्ट, इंटेलिजन्स टेस्ट, इंटरेस्ट टेस्ट आणि पर्सनॅलिटी टेस्ट या चाचण्यांचीही सुविधा मिळणार आहे.
अपयशाने खचू नये
- परीक्षेत आलेल्या अपयशाने विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. त्यांनी निकाल काहीही असला तरीही कुठलाही टोकाचा मार्ग अवलंबिता प्रथम सुशांत वैद्य फाउंडेशनच्या तज्ज्ञांशी चर्चा करावी. त्यांना नक्कीच पुढील भविष्यासाठीचा मार्ग सापडेल.
डॉ. मृणाल भारद्वाज, अध्यक्षा सुशांत वैद्य रिसर्च फाउंडेशन
बातम्या आणखी आहेत...