आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशावरील संकटावेळी मतभेद गाडून टाकत राखावी एकजूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काश्मीरवरील संकट हे संपूर्ण देशासाठीचे असून अशा वेळी अापापसातील मतभेद गाडून सर्वांनी एकजूट कायम राखावी, असे अावाहन माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. त्यांच्या हस्ते प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर, संगीतकार अन्नू मलिक, अाॅलिम्पियन दत्तू भाेकनळ यांच्यासह दहा जणांना सुविचार गाैरव पुरस्कार देऊन गाैरविण्यात अाले.
स्वामी नारायण मंदिराच्या बंॅक्वेट हाॅलमध्ये पुरस्कारांचे वितरण करण्यात अाले. खासदार पटेल म्हणाले, ‘भारताने यापूर्वीची पाकविरुद्धची सर्व युद्धे जिंकली असली तरी अाता पूर्वीसारख्या लढाया हाेणार नाहीत. हा न्यूक्लिअरचा जमाना असल्याने केवळ सैनिकांच्या बळावर युद्धे जिंकता येणार नाहीत. देशातील प्रत्येक नागरिकाला अार्थिकदृष्ट्या उन्नत बनवल्यासच देश खऱ्या अर्थाने सक्षम हाेऊ शकेल. अापली शिस्त अाणि इच्छाशक्ती अनेकदा कमी पडत असल्याने प्रगत देशांच्या तुलनेत अापण मागे पडताे.’

पुरस्कारार्थींच्या वतीने दत्तू भाेकनळ, प्राचार्य डाॅ. माे. स. गाेसावी, ब्रह्मदेव सरडे, माेहनलाल कुमट प्रमाेद माेरे यांनी मनाेगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र पगार यांनी, तर सूत्रसंचालन अाकाश पगार यांनी केले. यावेळी अॅड. अशोक खुटाडे तसेच मान्यवर उपस्थित होते.

प्रेम कायम ठेवावे : भांडारकरयांनी सर्व मराठी जनता अाणि देशभरातील नागरिकांनी माझ्या चित्रपटांवर प्रेम केल्यानेच यशस्वी झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, चित्रपटाच्या दुनियेत तुम्हाला फिल्मी बॅकग्राऊंड नसेल तर प्रस्थापित व्हायला खूप परिश्रम करावे लागतात. त्यामुळे या यशामागे खूप कष्ट अाहेत. व्हीडिअाे पार्लर चालवून अनेक घरी व्हिडीअाे कॅसेट देण्याचा व्यवसाय चार वर्षांहून अधिक काळ केल्यानंतर सहायक दिग्दर्शक अाणि त्यानंतर दिग्दर्शक झालाे. त्यानंतर चार चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे कष्टाचे चीज झाले.

अन्नू मलिकच्या गाण्यांनी जिंकली मने : मलिकयांनी सांगितले की, १९७७ पासून संगीत क्षेत्रात काम करताेय अाणि २०१५ मध्येही माझ्या गाण्यांना पुरस्कार मिळाले अाहेत. अजूनही खूप काही करायचे अाहे. यावेळी त्यांनी ‘संदेसे अाते हैं’ हे बाॅर्डर चित्रपटातील गीत, तसेच ‘गरम चाय की प्याली हाे’, ‘लडकी मस्त मस्त तू अायला रे ही गाणी गाऊन उपस्थितांची मने जिंकली. नासिक के अंगूर अाैर माैसम है अाॅसम, असे म्हणत नाशिकलाही दाद दिली.

सुविचार गाैरव पुरस्कार वितरणप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासमवेत संगीतकार अन्नू मलिक, मधुर भांडारकर, दत्तू भाेकनळ, प्रमाेद माेरे, प्राचार्य डाॅ. माे. स. गाेसावी, प्राचार्य डाॅ. दिलीप धाेंडगे, डाॅ. राहुल कैचे, ब्रह्मदेव सरडे, माेहनलाल कुमट, कु. सृष्टी नेरकर, रवींद्र पगार अाकाश पगार.
अायाेजकांकडून नियाेजनात घाेळ
कार्यक्रम वाजता सुरू हाेणे अपेक्षित असताना वाजता प्रारंभ झाला. बंदिस्त सभागृहात असूनही पुरस्कार प्रदान करताना स्टेजलगतच माेठे भुईनळे लावण्यात येत हाेते. अागीची शक्यता असल्याने मान्यवरांनी ‘भुईनळे नकाे’, असे सांगूनही ती लावली हाेती.

प्रियांकाचा फाेन अन‌् मधुरचा माेबाइल परत
मधुर भांडारकर यांचा माेबाइल सभागृहात प्रवेश करताना कुठेतरी पडला. नाशिकच्या जितू नावाच्या तरुणाला ताे सापडला. तेवढ्यात त्यावर प्रियांका चाेप्राचा फाेन अाल्याने ताे भांडारकर यांचाच असणार असे समजून त्याने ताे अायाेजकांकडे सुपूर्द केला.
बातम्या आणखी आहेत...