आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानी संघटना शिवसेनेच्या पाठीशी; नाशिक, पुणे, पिंपरी- चिंचवडमध्‍ये साेडली भाजपची साथ(महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शेतकऱ्यांचा विश्वासघात करून त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने नाशिक महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेला पाठिंबा दिला अाहे. संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी ही माहिती दिली. दरम्यान, पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिकेतही संघटनेने हाच निर्णय घेतला अाहे. राज्याच्या सत्तेत भाजपसाेबत असलेल्या या संघटनेने एेन निवडणुकीच्या काळात हा निर्णय घेऊन भाजपला दणका दिल्याचे बाेलले जाते.

वडघुले यांनी सांगितले की, ‘भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कृषीमालाला हमी भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी ते पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही सत्तेला गौण मानत असल्याने नाशिक जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवडणुकीमध्ये शिवसेनेला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला अाहे.’ 

दरम्यान, असा निर्णय घेऊन खासदार राजू शेट्टींच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांशी जास्त जवळीक साधून संघटनेकडे दुर्लक्ष करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व कृषी राज्यमंत्री सदाशिव खाेत यांनाही एकप्रकारे ‘चेक’ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अाहे.

भाजपचे मित्र शिवसेेनेकडे येणार : परब
भाजपचा खरा चेहरा लक्षात येऊ लागल्यानेच त्यांचे मित्रपक्ष अाता पक्ष दूर जाऊ लागले आहेत. सर्व मित्रपक्ष शिवसेनेकडेच येणार असून आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना अामदार अनिल परब यांनी दिली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...