आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swachata Mohim Implemented In Nashik's Various Places

स्वच्छता अभियानाची ‘पाटी’ राहिली रिकामी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कामकाजाच्या दिवशी आयाेजित करण्यात आलेले स्वच्छता अभियान केवळ ‘साजरे’ करण्यात आल्याचेच चित्र महानगरातील बहुतांश भागांमध्ये दिसले. या अभियानात सामान्य जनतेचा सहभाग फारसा दिसलाच नाही. त्यातच पालकमंत्रीही वृक्षारोपणानंतर स्वच्छतेचा केवळ ‘देखावा’ करून मार्गस्थ झाल्याने शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनीही केवळ शपथा घेण्यात किंवा दोन-चार ठिकाणी झाडू फिरवण्यात धन्यता मानली. तुलनेत वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये बऱ्यापैकी उत्साह जाणवला.
हरित कुंभ संकल्पनेअंतर्गत बुधवारी (दि. १) नद्यांसह महानगरात ६३ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र, गत महिन्यात जागतिक पर्यावरणदिनी झालेल्या पहिल्या स्वच्छता अभियानात जनसामान्यांसह शासकीय, खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांमध्ये दिसलेल्या उत्साहाच्या एक चतुर्थांश उत्साहही बुधवारी दिसला नाही. कामकाजाचा दिवस असल्याने जनसामान्यांची किरकाेळ उपस्थिती होती. मोजक्या ठिकाणी थोडी फार स्वच्छता झाली.

स्वच्छता अभियानाची ‘पाटी’ राहिली रिकामी
देण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सकाळी ७.३० वाजता गोल्फ क्लब येथील ईदगाह मैदानावर पालकमंत्री गिरीश महाजन जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
वडाळ्यात स्वच्छतेचा अभाव : उपनगर, वडाळागाव या परिसरात अस्वच्छतेचेच साम्राज्य कायम होते. तेथील स्वच्छता मोहीम ‘रोजच्या सारखीच’ महापालिका कर्मचाऱ्यांनीच राबवली. नागरिक-सामाजिक संस्थांचा सहभाग कुठेही दिसला नाही. नाशिक-पुणे महामार्गावर जयरामभाई हायस्कूलच्या वदि्यार्थ्यांनी मार्गाच्या बाजूला स्वच्छता केली.

इंदिरानगरला कर्मचाऱ्यांनीच केली स्वच्छता : स्वच्छता मोहिमेत लोकांनी सहभाग घेतल्याने कर्मचाऱ्यांनीच इंदिरानगर परिसरात ठिकठिकाणी स्वच्छता केली. भगतसिंग चौक, राणेनगर, साई पॅलेस परिसर, साईनाथनगर, जॉगिंग ट्रॅक परिसर, भारतनगर, रथचक्र परिसरात कर्मचाऱ्यांनी कचरा संकलित केला. स्वच्छता मोहिमेत विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ, विभागीय निरीक्षक पी. डी. पाटील, दीपक बोडके हे सहभागी झाले होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, जुन्या नाशकात केवळ फोटोंसाठी फिरले झाडू...