आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनव उपक्रम : ‘नाशिक की ब्यूटी, हम सब की ड्यूटी’ ; हजारो विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘साफसफाईसेहत लायी..,’ ‘नाशिक की ब्यूटी, हम सब की ड्यूटी..’, ‘स्वच्छ नाशिक-सुंदर नाशिक..’, ‘स्वच्छता तेथे आरोग्य...’ अशा घोषणा देत समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी नॅशनल उर्दू हायस्कूलमधील हजारो विद्यार्थ्यांनी मंगळवारी "स्वच्छता जनजागृती फेरी' काढली.
सार्वजनिक ठिकाणे सदैव स्वच्छ ठेवण्याची शपथही विद्यार्थ्यांनी घेतली. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे, त्यांच्यामध्ये सामाजिक जाणिवेची भावना आणि श्रमप्रतिष्ठेचे मूल्य रुजावे, यासाठी बालस्वच्छता मोहिमेंतर्गत नॅशनल हायस्कूलतर्फे ही जनजागृती फेरी काढण्यात आली. सारडा सर्कल येथून यूथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी बबलू पठाण यांच्या उपस्थितीत फेरीचे उद‌्घाटन करण्यात आले. विश्वस्त सलीम शेख, बाबा वकील, मुख्याध्यापक हाजी सादिक शेख, नदीम शेख, इरफाना पीरजादा, जमीर खान आदी शिक्षक उपस्थित होते.

चौकमंडई, बागवानपुरा, कथडा, मीरा दातार चौक, आझाद चौक, काझीपुरा, मुलतानपुरा, बडी दर्गा परिसर, दूधबाजार मार्गाने सारडा सर्कल येथे या फेरीचा समारोप करण्यात आला. शाळेतील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी फेरीत सहभागी झाले होते.
फलकांद्वारे केले जनप्रबोधन
विद्यार्थ्यांनीसार्वजनिक ठिकाणे, बसथांबे, शाळा, सोसायट्या स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. ‘सफाई आधा इमान है.., साफ रहोगे तो सेहतमंद रहोगे..,’ ‘हे लक्षात घेता का पाऊस का पडत नाही, डेंग्यूचा आजार का येतो' अशा आशयाचे विविध फलक हातात घेऊन नॅशनल हायस्कूलमधील हजारो विद्यार्थ्यांनी जनप्रबोधन केले.