आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वच्छ भारत’च्या माध्यमातून स्मार्ट सिटीची चाचपणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्मार्टसिटीचे आव्हान पेलण्यासाठी प्रशासनाने अापला अहवाल दिल्ली दरबारी पाठवून सुटकेचा नि:श्वास साेडला असला, तरी नगरविकास मंत्रालयाने मात्र स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून अाता सर्वसामान्य नागरिकांशी माेबाइलवर संपर्क साधून शहराचे सर्वेक्षण सुरू केले अाहे. यात विशेषत: स्वच्छतेच्या बाबतीतील प्रश्नांवर भर दिला जात अाहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षावरदेखील स्मार्ट सिटीचे भवितव्य अवलंबून असल्याचे दिल्लीतील सूत्रांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांच्या अावाजाची ध्वनिफीतही या सर्वेक्षणाच्या प्रारंभी एेकविण्यात येत अाहे. नाशिकमध्येही अनेकांना या सर्वेक्षणासाठी संपर्क साधण्यात अाला अाहे.

स्मार्ट सिटी याेजनेमध्ये असलेल्या स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही)च्या प्रस्तावाला सर्वपक्षीय गटनेत्यांनी सशर्त अटींद्वारे मंजुरी दिल्यानंतर संबंधित उपसूचनांसह महासभेचा ठराव केंद्र सरकारच्या नगरविकास विभागात १५ डिसेंबर राेजी रवाना करण्यात अाला अाहे. अाता नगरविकास विभागच या ठरावाचे भवितव्य ठरविणार अाहे. त्यापूर्वी ‘एसपीव्ही’मुळे महापालिकेची स्वायत्तता धाेक्यात येणार असल्याचा अाक्षेप घेत महासभेने स्मार्ट सिटीतून ‘एसव्हीपी’ वगळण्याचा ठराव केला हाेता. परंतु, अायुक्तांच्या अाग्रहानंतर सर्वपक्षीय गटनेत्यांना स्मार्ट सिटीचे महत्त्व विशद करण्यात अाले. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर प्रस्तावास सशर्त मंजुरी देण्यात अाली. त्यात ‘एसपीव्ही’ला अाता ‘नाशिक महापालिका कंपनी’ असे नाव देण्याची अट टाकण्यात अाली. हा ठराव दिल्ली दरबारी गेल्यानंतर त्यावर नगरविकास मंत्रालय काय निर्णय घेते, याकडे अाता सर्वांचे लक्ष लागले अाहे. येत्या २६ जानेवारी राेजी यावर निर्णय हाेण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत अाहे.

..असे हाेतेय सर्वेक्षण
दिल्लीहून काॅल अाल्यावर प्रथम हिंदी किंवा इंग्रजी या दाेन भाषांपैकी एका भाषेची निवड करायला लावली जाते. त्यानंतर केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू हे स्वच्छ भारत अभियान अाणि स्मार्ट सिटी यासंदर्भातील थाेडक्यात माहिती देतात. अर्थात, ही माहिती रेकाॅर्डेड असते. त्यानंतर सर्वेक्षण सुरू हाेते. यात शहरातील स्वच्छतेवर अापण समाधानी अाहात का, कचराकुंड्या नियमित साफ हाेतात का, अन्य शहरांच्या तुलनेत तुम्हाला तुमचे शहर स्वच्छ वाटते का, तुमच्या घरामध्ये शाैचालय अाहे का अादी प्रश्न विचारले जातात.