आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत : नाशिककरांना ‘स्वाइन’चा विळखा, अपुरी आरोग्य यंत्रणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक विभागाला स्वाइन फ्लूचा विळखा बसत चालला आहे. जुने सिडको येथील जगदीश वसंत खैरनार (५८) यांचा स्वाइन फ्लूसदृश आजाराने सोमवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
यामुळे स्वाइन फ्लूसदृश आजाराने बळी गेलेल्यांची संख्या शहरात तीन झाली आहे. स्वाइन फ्लूसदृश आजाराच्या रुग्णांची प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. यामुळे अशा रुग्णांची संख्या वाढत आहे, परंतु जिल्हा रुग्णालयाचा स्वाइन फ्लू कक्ष पाच रुग्ण क्षमतेचा आहे. यामुळे स्वाइन फ्लूच्या या संकटाला तोंड देण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य उपसंचालक कार्यालयाने महापालिकेचे आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांना खासगी रुग्णालयात दाखल स्वाइन फ्लू संशयित रुग्णांची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. या रुग्णालयांकडील औषधसाठा तपासण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
सरकारी नियमाप्रमाणे स्वाइन फ्लूचे उपचार करणाऱ्या खासगी दवाखान्यांना फी घेणे बंधनकारक केले आहे. अवाजवी फी घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपसंचालक डॉ. बी. डी. पवार यांनी सांगितले. खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे.

औषधांचा असा आहे साठा

टॅमिफ्लू- ३० एमजी- ४३ हजार, ४५ एमजी- ३१ हजार, ७५ एमजी- लाख, सिरप- ७३९ बाटल्या, एन.५ मास्क- २७२८.

स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या चार हजार २८० रुग्णांची तपासणी आजवर करण्यात आली. २१ पॉझिटिव्ह आढळले नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर या सर्कलमध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाला. तीन रुग्ण नाशिक शहरातील आहेत.


^स्वाइन फ्लूची लक्षणे असलेले रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागास देणे बंधनकारक केले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -डॉ. बी.डी. पवार, उपसंचालक,नाशिक विभाग