आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लपलेला गणू हाेता बिबट्याच्या जबड्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव - गणू अन् मी लपवाछपवी खेळत होतो. माझ्यावर डाव होता. मी लपलेल्या गणूला शाेधण्यासाठी वळलो तर गणू बिबट्याच्या जबड्यात होता. बिबट्या त्याला घेऊन वेगाने पळत होता. काही क्षण मला काहीच कळेना.. तरी मी प्रचंड घाबरून जाेरात ओरडलाे. गणूला बिबट्याने खाल्लं.. पळा.. वाचवा.. पळा... भीतीने अंगावर शहारा आणणारी ही वाक्यं आहेत आठ वर्षीय स्वप्नील पोटेची.

निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात असलेल्या भुसे गावापासून अडीच किलोमीटरवर भेंडाळी रस्त्यावर पोटे वस्तीवर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गणेश मदन पोटे (४ वर्षे) हा ठार झाला. त्यानंतर शनिवारी सकाळी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने घटनास्थळाला भेट देऊन घडल्या प्रकाराची माहिती घेतली. उर्वरित.पान

लपलेल्या गणूला शाेधण्यासाठी वळलाे, िदवसमावळला होता. सातची िदवे लागण्याचीही वेळ होती. या वेळी गणेश पोटे, त्याचा चुलतभाऊ स्वप्नील पोटे घराच्या अंगणात खेळत होते. आजोबा निवृत्ती पोटे, आजी मीराबाई गणेशची आई उज्ज्वला घराबाहेर गप्पा मारत बसल्या होत्या. गणू खेळता-खेळता थोडा लांब गेला पाठीमागून अचानक बिबट्या आला त्याने गणेशला उचलून धूम ठोकली. हे सर्व पाहून स्वप्नील तसेच त्याच्या आजोबांनी आरडाओरड केली. शेजारी दोन-तीन वस्त्या असल्याने िदनकर पोटे, रामेश्वर निरगुडे, गणेशचे वडील मदन पोटे यांनीही आरडाओरड करत बिबट्या ज्या दिशेने गेला, त्या ठिकाणी शोध सुरू केला. जवळच्या उसात बिबट्या पळाला होता. अर्धा ते पाऊण तास गणेशचा शोध सुरू होता. मात्र,बिबट्याने मार्ग बदलून घरापासून दीडशे मीटर अंतरावर गणेशला जखमी अवस्थेत टाकून पळ काढला. रामेश्वर निरगुडे यांनी गणेशला जखमी अवस्थेत शोधून काढले. त्याला तातडीने निफाडला उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे प्राण गेले होते. घरातील मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याने पोटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आजी-आजोबा हंबरडा फोडून रडत आहेत. डोळ्यादेखत नातू गेल्याचे दु:ख त्यांचे काळीज पिळवटून टाकत आहे. गणेशला बिबट्याने उचलून ठार केल्याची घटना समजताच वनविभाग खडबडून जागा झाला. त्यांनी कारंजी येथून पिंजरा आणून तेथे लावला. वनविभाग कर्मचारी पोलिसांबराेबरच परिसरातील तरुणही या नरभक्षक बिबट्याचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री बिबट्या याच परिसरात होता. त्याने पिंजऱ्याच्या आसपास फिरण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावामुळे तो पळून जात होता.

गणेशची आई रुग्णालयात भरती
डोळ्यादेखत पोटच्या मुलाला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्याचे ऐकून आई उज्ज्वला बेशुद्ध पडल्या. करंजगाव येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची चौकशी केली असता त्यांनी एकच हंबरडा फोडला. गणूला मामाच्या लग्नाला न्यायचे होते, असे सांगताना त्यांना अश्रू आवरता आले नाही.

दाेन वर्षांत तीन बालकांनी गमावले प्राण
लासलगाव गाेदाकाठपरिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दाेन वर्षांत तीन बालके, तर एक महिला ठार झाली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये नेहमी भीतीचे वातावरण असते. गाेदाकाठ परिसरात उसाचे क्षेत्र माेठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा अाहे. त्यामुळे बिबट्यांच्या नागरी वस्तीवर हाेणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली अाहे.
२०१३ मध्ये शिवरे परिसरात ऊसताेड कामगाराचा मुलगा दुर्गेश गाेसावी सायंकाळी खेळत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाला. याच वर्षी िदवस मावळला होता. सातची िदवे लागण्याचीही वेळ होती. या वेळी गणेश पोटे, त्याचा चुलतभाऊ स्वप्नील पोटे घराच्या अंगणात खेळत होते. आजोबा निवृत्ती पोटे, आजी मीराबाई गणेशची आई उज्ज्वला घराबाहेर गप्पा मारत बसल्या होत्या. गणू खेळता-खेळता थोडा लांब गेला पाठीमागून अचानक बिबट्या आला त्याने गणेशला उचलून धूम ठोकली. हे सर्व पाहून स्वप्नील तसेच त्याच्या आजोबांनी आरडाओरड केली. शेजारी दोन-तीन वस्त्या असल्याने िदनकर पोटे, रामेश्वर निरगुडे, गणेशचे वडील मदन पोटे यांनीही आरडाओरड करत बिबट्या ज्या दिशेने गेला, त्या ठिकाणी शोध सुरू केला. जवळच्या उसात बिबट्या पळाला होता. अर्धा ते पाऊण तास गणेशचा शोध सुरू होता. मात्र, बिबट्याने मार्ग बदलून घरापासून दीडशे मीटर अंतरावर गणेशला जखमी अवस्थेत टाकून पळ काढला. रामेश्वर निरगुडे यांनी गणेशला जखमी अवस्थेत शोधून काढले. त्याला तातडीने निफाडला उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे प्राण गेले होते. घरातील मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याने पोटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आजी-आजोबा हंबरडा फोडून रडत आहेत. डोळ्यादेखत नातू गेल्याचे दु:ख त्यांचे काळीज पिळवटून टाकत आहे. गणेशला बिबट्याने उचलून ठार केल्याची घटना समजताच वनविभाग खडबडून जागा झाला. त्यांनी कारंजी येथून पिंजरा आणून तेथे लावला. वनविभाग कर्मचारी पोलिसांबराेबरच परिसरातील तरुणही या नरभक्षक बिबट्याचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री बिबट्या याच परिसरात होता. त्याने पिंजऱ्याच्या आसपास फिरण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावामुळे तो पळून जात होता.

गणेशचीआई रुग्णालयात भरती
डोळ्यादेखतपोटच्या मुलाला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्याचे ऐकून आई उज्ज्वला बेशुद्ध पडल्या. करंजगाव येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची चौकशी केली असता त्यांनी एकच हंबरडा फोडला. गणूला मामाच्या लग्नाला न्यायचे होते, असे सांगताना त्यांना अश्रू आवरता आले नाही.