आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहनाई, व्हायाेलिनच्या सुरांनी भरले रंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जीवनातील प्रत्येक मंगलमय क्षणाची साक्ष बनलेल्या शहनाईतून निघालेले शामकल्याण रागातील सूर, तर दुसरीकडे शब्दश: बाेलणाऱ्या व्हायाेलिनमधून निघालेल्या देस रागातील सुरांना क्षणाेक्षणी रसिक श्राेत्यांकडून मिळत गेलेली दाद... अशी रंगत गेलेली मैफल रसिकश्राेत्यांना अानंदाचा ठेवा देणारी ठरली. उस्ताद बिस्मिल्लाखाँ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘दिव्य मराठी’ अाणि व्हायाेलिन अकॅडमीच्या वतीने कालिदास कलामंदिरात अायाेजित स्वरझंकार या मैफलीचे अायाेजन करण्यात अाले हाेते.
उस्ताद रशीद खान यांच्यासह व्हायाेलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये, पं. विजय घाटे, प्रख्यात शहनाईवादक अश्विनी शंकर, प्रमाेद गायकवाड नम्रता गायकवाड, मुराद अली अाणि पं. अजय जाेगळेकर यांनी त्यांच्या कलांचे सादरीकरण केले. त्यांना तबल्यावर तितक्याच ताेलामाेलाची साथ पं. विजय घाटे अाणि नितीन वारे यांनी दिली.

मैफलीच्या प्रारंभी शहनाई वादनात शामकल्याण रागातील सूर अाळवले गेले. उर्वरित.पान
स्वरझंकार मैफलीत उस्ताद रशीद खान यांनी बागेश्री रागातील तराना सादर केला. या मैफलीने नाशिककर रसिकांना मंत्रमुग्ध केले.
बातम्या आणखी आहेत...