आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वरझंकार’चा नजराणा, अशी रंगणार मैफल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गायक,वादक जसे स्वरांवर अधिराज्य गाजवत असतात तसेच पट्टीचे कानसेन नाशिककर रसिकपण आहेत. म्हणूनच नाशिककरांसाठी दिग्गज गायक, वादकांचा ‘स्वरझंकार’ दोन दिवस नाशिकमध्ये रंगणार असल्याने हा अनाेखा स्वरनजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे .
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार करणाऱ्या व्हायोलिन अकादमी, पुणे यांच्या वतीने ही स्वरमैफल होणार आहे. ‘दिव्य मराठी’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. पंडित शविकुमार शर्मा, उस्ताद ताैफिक कुरेशी, देवकी पंडित, पंडित उपेंद्र भट, पंडित रामदास पळसुले आणि पंडित योगेश सास्मी यांच्या स्वरतालाने ही मैफल सजणार आहे. स्वरझंकारचे हे नाशिकमधील पाचवे वर्ष असून, गेल्या पाच वर्षांमध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित शिवामणी, उस्ताद झाकीर हुसेन, उस्तार शाहिद परवेझ, पंडित अजय चक्रवर्ती, पंडित अतुल कुमार, पंडित संजीव अभ्यंकर, अश्विनी भिडे-देशपांडे यांसारख्या दिग्गज स्वरपूजकांनी येथे आपले स्वरवंदन केले आहे. आता पुन्हा एकदा नाशिककर रसिकांपुढे या मैफलीतून स्वरदीप उजळणार असल्याने रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रविवार, दि. १६ : सायंकाळीसहा वाजता आजच्या पिढीतील लोकप्रिय गायिका देवकी पंडित यांच्याकडून रसिकांना स्वरानंद मिळेल. सारेगमप या रिअॅलिटी शोच्या उत्तम परिक्षिका म्हणून आणि आपल्या जवळची गायिका म्हणून त्या रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत..