आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाती चिखलीकरांचा जामीन अर्ज मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी संपत्ती जमवणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर याची पत्नी स्वाती यांनी अटकपूर्व जामिनासाठी स्थानिक न्यायालयात दाखल केलेला अर्ज सोमवारी स्वत:हून मागे घेतला.

चिखलीकर व स्वाती यांच्या नावे असलेल्या विविध बँकांच्या लॉकर्समध्ये सुमारे 20 कोटींपर्यंतची मालमत्ता सापडली आहे. या प्रकरणात स्वाती यांना सहआरोपी म्हणून अटक करण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्याकडून तातडीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. विशेष न्यायालयाने त्यांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत कायम अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी ठेवली होती. मात्र, ‘एसीबी’ने स्वाती यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर होण्याबाबत शंका व्यक्त होत होती. त्यातच सोमवारी स्वाती यांनी अर्ज मागे घेतला. दरम्यान, चिखलीकर व जगदीश वाघ यांच्यावर उपचार सुरू असल्याने तपासात अडथळा निर्माण होत आहेत.