आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

९५ हजार स्वयंसेवकांचे अाज राज्यात फुलपॅन्टमध्ये संचलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात प्रथमच अर्ध्या विजारीतून पूर्ण विजार (हाफपॅन्टवरून फुलपॅन्ट) असा बदल करण्यात अाला असून, मंगळवारी देशभरात निघणाऱ्या संचलनात फुलपॅन्टमध्ये स्वयंसेवक सहभागी हाेतील. महाराष्ट्रातील संघरचनेनुसार निर्माण केलेल्या वेगवेगळ्या चार प्रांतांतील सुमारे ९५ हजार स्वयंसेवक या नव्या गणवेशात दिसणार अाहेत. विशेष म्हणजे, गणवेशातील या बदलामुळे स्वयंसेवकांच्या संख्येतही १० ते १२ हजारांनी वाढ झाल्याची शक्यता संघाच्या अधिकृत सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना वर्तविली.
‘परम वैभवंम् नेतूमेतत्र स्वराष्ट्रम्’ या ब्रीदवाक्यासह हिंदुस्थानाला म्हणजेच संपूर्ण राष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्याचे ध्येय उराशी बाळगून संघाच्या संचलनात स्वयंसेवक सहभागी हाेतात. १९२५ मध्ये पारतंत्र्याच्या काळात डाॅ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या संघात स्वयंसेवकांच्या गणवेशात खाकी हाफपॅन्ट हाेती. तेव्हापासून ते अातापर्यंत संघाच्या गणवेशात किरकाेळ बदल झाले. परंतु, खाकी हाफपॅन्टमध्ये कधीही बदल करण्यात अालेला नव्हता. संघाच्या दैनंदिन शाखांमध्ये स्वयंसेवकांना शारीरिक कसरती करण्यासाठी एक स्वतंत्र अाेळख म्हणन कायम या पॅन्टचा अाग्रह असायचा. मात्र, गेल्या काही वर्षांत स्वयंसेवकांची संख्या हाफपॅन्टमुळे कमी हाेत असल्याचे संघाच्याच पाहणीत अाढळून अाल्याने केंद्रीय बैठकीत गणवेशात बदल करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार खाकी हाॅफपॅन्टएेवजी अाता फुल राखाडी रंगाच्या पॅन्टचा समावेश करण्यात अाला. त्यामुळे डाेक्यावर काळी टाेपी, अंगात पांढरा हाफ शर्ट, राखाडी पॅन्ट, तांबड्या रंगाचा कंबरेचा पट्टा, राखाडी रंगाचेचमाेजे, काळे बूट असा गणवेश असून, त्यातच प्रथमच यंदाचे विजयादशमी संचलन हाेईल.
राज्यभरातून ९५ हजार स्वयंसेवक : संघाच्यारचनेनुसार नाशिक, पुणे, काेल्हापूर, सांगली, सातारा अशा एकूण सात जिल्ह्यांच्या पश्चिम प्रांतातून किमान १२० ठिकाणी संचलन हाेणार अाहे. यात सुमारे २३ हजार स्वयंसेवक सहभागी हाेतील. खान्देशातील तीन जिल्ह्यांसह अाैरंगाबाद इतर अशा ११ जिल्ह्यांच्या मराठवाडा प्रांतात १०० ठिकाणी हाेणाऱ्या संचलनात १४ हजार स्वयंसेवकांचा सहभाग असेल. प्रांतप्रमुख वामनराव देशपांडे यांनी ही माहिती दिली. काेकण प्रांतातील मुंबई, ठाणे, रायगडसह २९ विभागांत ११० ठिकाणी संचलन हाेणार अाहे. त्यात २८ हजार स्वयंसेवक सहभागी हाेणार असून, गत वर्षाच्या तुलनेत ही संख्या हजारांनी जास्त असल्याची माहिती काेकण प्रांतचे प्रचारप्रमुख प्रमाेद बापट यांनी दिली.

नागपुरात मुख्यमंत्र्यांसह भाजप पदाधिकारी हाेणार सहभागी : संघाचेमुख्यालय असलेल्या नागपूरमधील रेशीमबागेत हाेणाऱ्या संचलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील फुलपॅन्टच्या गणवेशातील स्वयंसेवक म्हणून सहभागी हाेणार असल्याचे सांगण्यात येत अाहे. त्याचप्रमाणे नागपूर शहरासह विदर्भ प्रांत समजल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या १९ जिल्ह्यांतील सुमारे ३० हजार स्वयंसेवक नवीन संपूर्ण गणवेशात सहभागी हाेणार असल्याचे सांगण्यात अाले.

शांततेचा संदेश
^राजस्थानातील भिलवाडा येथून नागपूर मुख्यालयात फुलपॅन्ट प्राप्त झाल्या असून, तिथून प्रत्येक प्रांताला गणवेश पुरविण्यात अाले अाहेत. प्रत्येक जिल्हा अाणि तालुकास्थानी फुलपॅन्ट उपलब्ध अाहेत. स्वयंसेवकांचा उत्साह अाणि सघाेष संचलनाने समाजात सुरक्षितता, शांतता अाणि संघटनाचा संदेश दिलाजाताे. - दिलीप क्षीरसागर, प्रांत प्रचारप्रमुख.
बातम्या आणखी आहेत...