नाशिकराेड - शाळा, महाविद्यालयांना सुट्यांमुळे नाशिकराेडच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिजाऊ तरणतलाव शिकाऊ नियमित जलतरणपटूंच्या गर्दीने फुलून गेले आहे.दरराेज ७०० शिकाऊ, तर नियमित ७७८ जलतरणपटू येथे पाेहाेण्याचा आनंद लुटत आहेत.
महापालिकेच्या जलतरण तलावांपैकी सर्वात माेठा असलेल्या जिजाऊ जलतरण तलावात शिकाऊ, काॅम्पिटीटिव्ह, ड्राईव्हिंग लहान मुलांसाठी महिलांसाठी स्वतंत्र असे पाच पूल आहेत. पुलाला महिलांसह जलतरणपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दरराेज सकाळी तीन तर सायंकाळी दाेन बॅचदेखील कमी पडत आहेत.उन्हाळी सुट्यांमुळे जलतरणपटूंची गर्दी वाढल्याने नियमित जलतरणपटूंना अडचण निर्माण हाेत आहे. दरराेज पाच बॅचला ७००पेक्षा अधिक शिकाऊ जलतरणपटू पाेहण्यासाठी येऊन आनंद लुटत आहेत. महिलांसाठी असलेल्या स्वतंत्र पुलात दरराेज ३०० पेक्षा अधिक महिला जलतरणाचा आनंद लुटत आहेत. पुलाचे ४७८ आजीवन, तर ३०० वार्षिक सभासद आहेत. शिकाऊ तसेच नियमित जलतरणपटूंमध्ये उन्हाळी शिबिरातील विद्यार्थ्यांची भर पडत आहे.सध्या तलावावर तीन उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे चालू असून, शालेय विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले आहेत.
जलतरणपटूंचा वर्षभर प्रतिसाद
आंतरराष्ट्रीयदर्जाच्या नाशिकराेड येथील या जलतरण तलावाला जलतरणपटूंचा वर्षभर प्रतिसाद असताे. उन्हाळ्याच्या सुटीत जलतरणपटूंची वाढ हाेते. जलतरणपटूंना काेणतीही अडचण येऊ नये म्हणून तलाव पाण्याची याेग्य ती काळजी घेतली जात आहे. शिकाऊ विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक तैनात आहे. मायाजगताप, व्यवस्थापक, जिजाऊ तरणतलाव
महापाैरांकडून पाहणी
आंतरराष्ट्रीयदर्जाच्या जिजाऊ तरणतलावाची महापाैर अशाेक मुर्तडक यांनी अचानक पाहणी केली. यामुळे व्यवस्थापनाची धावपळ उडाली. महापाैरांनी व्यवस्थापक माया जगताप यांच्याशी चर्चा केली. शहरातील तरणतलावात नाशिकराेडच्या तलावाची याेग्य पध्दतीने देखभाल केली जात असल्याचे गाैरवाेद्गार महापाैरांनी या पाहाणीप्रसंगी काढले. या वेळी जलतरणपटू दीपक देसाई, व्यापारी बँकेचे संचालक हेमंत गायकवाड उपस्थित हाेते.