आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यूचा उद्रेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गतवर्षाप्रमाणे यंदाही शहरात अाॅक्टाेबर महिन्यात स्वाइन फ्लूने डाेेके वर काढल्याचे चित्र असून, स्वाइन फ्लूमुळे गेल्या १८ दिवसांत ११ लाेकांचा मृत्यू झाला अाहे. विशेष म्हणजे ९४ संशयितांपैकी २२ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे दाेन्ही अाजारांविषयी नागरिकांनी तसेच अाराेग्य यंत्रणांनी दक्षता घेण्याची माेठी गरज निर्माण झाली अाहे.

गेल्यावर्षी अाॅक्टाेबर महिन्यात खासकरून डेंग्यूने धुमाकूळ घातला हाेता. यंदा मात्र स्वाइन फ्लू डेंग्यू या दाेन्ही अाजारांचे संकट एकाचवेळी शहरात अाल्याचे चित्र अाहे. जानेवारीपासून अातापर्यंत ४२१ रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यात शहरात २२७, तर ग्रामीण भागातील १९४ रुग्णांचा समावेश अाहे. त्यापैकी ६८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात शहरातील ३१, तर ग्रामीण भागातील ३७ रुग्णांचा समावेश अाहे. चालू महिन्यात म्हणजे अाॅक्टाेबरमध्ये स्वाइन फ्लूमुळे ११ लाेकांचा मृत्यू झाला अाहे. डेंग्यूचे ९४ संशयित रुग्ण असून, त्यापैकी ४९ रुग्णांचे रक्त नमुने प्राप्त झाले अाहेत. त्यात २२ डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले असून, या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अाराेग्य विभागाची जबाबदारी वाढली अाहे.