आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात स्वाइन फ्लूचे आणखी चार बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/नाशिक- ऊन आणि थंडीच्या लपंडावामुळे उपराजधानीत स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून मंगळवारी नागपुरातील तिघांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. नागपुरात स्वाइन फ्लूमुळे मृत्यूची संख्या 30 वर पोहोचली आहे.
देशात आतापर्यंत 558 जणांचा बळी घेणाऱ्या या आजाराने राज्यातही थैमान घातले आहे. संपूर्ण राज्यभरात स्वाइन फ्लूने आतापर्यंत 58 जणांचा बळी घेतला आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे एकट्या नागपूरमधील आहेत. नाशिकच्या सिडको भागात स्वाइन फ्लूमुळे एक जण दगावला. राज्यातील नागरिकांनी स्वाइन फ्लूचा चांगलाच धसका घेतला आहे. देशात गेल्या पाच दिवसात 100 जणांचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे. राज्यात मंगळवारी स्वाइन फ्लूचे 37 नवे रुग्ण आढळून आले.