आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये ५३ रुग्णांपैकी महिनाभरात पाच जण स्वाइन फ्लूचे बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमध्ये सप्टेंबर महिन्यात दाखल ५३ रुग्णांपैकी 5 जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. पालिकेतील सहायक आयुक्त दर्जाचा अधिकारीदेखील स्वाइन फ्लूने आजारी असून त्यांना मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

पालिका हद्दीत जानेवारीपासून नऊ महिन्यांत संशयित ३२४ रुग्ण दाखल झाले होते. त्यातील २०२ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, २७ जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यातील १८ रुग्ण खासगी रुग्णालयात, जणांचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यात सप्टेंबरमध्ये ५३ रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असून, त्यातील रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. जिल्हाभरात १६८ रुग्ण दाखल झाले, त्यातील १६४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यातील २८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात २६ जणांचा खासगी रुग्णालयात, तर जणांचे शासकीय रुग्णालयात निधन झाले. पालिकेने कुंभमेळ्यानंतर विशेष स्वच्छता मोहीमदेखील राबविली आहे. मात्र, स्वाइन फ्लू प्रामुख्याने शिंकण्यातून, खोकण्यातून पसरत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

डेंग्यूचे रुग्ण उच्चभ्रू लोकवस्तीत
नाशकातडेंग्यूचे रुग्ण प्रामुख्याने उच्चभ्रू लोकवस्तीत आढळून येत आहेत. जानेवारीपासून नाशकात डेंग्यूबाधित १३२ रुग्ण आढळले असून, त्यात सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ४४ रुग्ण आढळले आहेत. मात्र, डेंग्यूमुळे या वर्षी एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. तरीदेखील नागरिकांनी पाणी साचू देण्याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. घराच्या आसपास कुठेही पाणी साचू देणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याने घरोघरी त्याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचेही महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळविले आहे.