आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीमुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढला, सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - थंडीमध्ये सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वेळीच उपचार घेणाऱ्या रुग्णांना स्वाइन फ्लूचा धोका निर्माण होत असून स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात रविवार (दि. ३) पर्यंत तीन संशयित रुग्णांवर उपचार सुरु हाेते. पावसाळ्यात या आजाराचा सर्वाधिक फैलाव होत असला तरी थंडीमध्ये स्वाइन फ्लूला पोषक वातावरण असल्याने त्याचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले अाहे. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण होत आहे. 

 

थंडीमध्ये सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढते. बरेचदा रुग्ण या आजाराकडे दुर्लक्ष करतात. अशा रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण होण्याची शक्यता अधिक असते. स्वाइन फ्लूस थंडीचे वातावण पाेषक असल्याने या विषाणूंचा हल्ला अधिक होतो. अशा काळात रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर एच वन एन वन आणि त्याच्या सारखा विषाणूचा संसर्ग होऊन स्वाइन फ्लूची लागण होते. आजार टाळण्यासाठी काळजी घेणे आणि लक्षण अाढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करावे. सर्दी-खोकल्यामुळे स्वाइन फ्लूसह मलेरिया, डेंग्यू आणि टायफाईड,थंडी ताप, होण्याची शक्यता वाढते. 

 

त्वरित उपचार घ्या... 
स्वाइन फ्लूच्या आजाराची लक्षणे सामान्य असतात. वरील लक्षण आढळलेल्या रुग्णांनी तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. स्वाइन फ्लू टाळण्यसाठी खबरदारी आणि उपचार हेच महत्त्वाचे अाहेत. हिवाळ्यात या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो. सर्दी, ताप, खोकला असल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा. 
- डॉ.प्रमोद गुंजाळ, वैद्यकीय अधिकारी, स्वाइन फ्लू कक्ष, जिल्हा रुग्णालय 

 

हे टाळा 
हस्तांदोलन,सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका. फ्लूसदृश औषध घेऊ नका. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. बाह्य रुग्ण विभागात सर्दी-खोकला असलेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार केले जातात. यातील अति खोकला असलेल्या रुग्णांचे वर्गीकरण करण्यात येऊन त्यांना उपचार देण्यात येतात. 

 

अशी घ्या काळजी 
एन्फ्लूएन्झा एच एन टाळण्यासाठी वारंवार साबण स्वच्छ पाण्याने हात धुवा. पौष्टिक आहार घ्या. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा. धूम्रपान टाळा. पुरेशी झोप विश्रांती घ्या. भरपूर पाणी प्या. 

 

काय आहे एन्फ्लूएन्झा (स्वाइन फ्लू) 
वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील प्रौढ व्यक्ती, जुनाट अाजारग्रस्त व्यक्ती, दमा ह्रदयाचा आजार, मूत्रपिंडाचे विकार, मधुमेह, यकृताचे विकार, रक्त अथवा चेतासंस्थेचे विकार, एचआयव्ही बाधित रुग्ण, गरोदर मातांना हा आजार बळावतो. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा, लहान मुलांमध्ये उलटी, जुलाब ही लक्षणे आढळतात. या आजाराचे निदान घशातील स्त्रावाचा नमुना घेऊन त्याच्या तपासणीद्वारे करता येते. 

बातम्या आणखी आहेत...