आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेची स्वाइन फ्लूशी चार व्हेंटीलेटरवर लढाई, नागरी तपासणीलाही वाटाण्याच्या अक्षता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-
Quote Placeholder
स्वाइन फ्लूची लागण झाल्यानंतर मृत्यूशय्येवर पाेहाेचणाऱ्या रुग्णाला वाचवण्यासाठी महत्त्वाची यंत्रणा म्हणून ज्या व्हेंटीलेटरची गरज भासते, त्याचे केवळ चारच संच महापालिकेच्या दवाखान्यात असल्याचे खुद्द वैद्यकीय अधीक्षकांनीच कबूल केले. विशेष म्हणजे, ही यंत्रेही दाेनच रुग्णालयात असून बाका प्रसंग उद‌्भवल्यास सिडकाे-सातपूरमधून जुने नाशिकमध्ये रुग्णांना पाठवण्याची जीवघेणी कसरत करावी लागते.
सातपूर परिसरातील एका महिलेला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचा अहवाल फेब्रुवारी राेजी वैद्यकीय विभागाला प्राप्त झाला. त्यानंतर महापाैर अशाेक मुर्तडक यांनी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. बी. अार. गायकवाड यांना बाेलावून चांगलीच झाडाझडती घेतली हाेती. दरराेज शहरात स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण किती याची अाकडेवारीही सादर करण्याचे अादेशही त्यांनी िदले हाेते. महापालिका रुग्णालयाबराेबरच खासगी रुग्णालयांना नाेटिसीद्वारे ताकीद देऊन अशा रुग्णांबाबत सतर्कता बाळगावी तसेच महापालिकेला तातडीने अवगत करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले हाेते. मंगळवारी या सूचनांवर काय अंमलबजावणी केली याचा अाढावा महापाैरांनी घेतल्यावर चांगलाच धक्का बसला. शहरातील स्लम परिसरात वैद्यकीय विभागाने पथकाद्वारे काय तपासणी केली याची अाकडेवारी अधीक्षकांकडे नव्हती. फक्त किती रुग्णांना टॅमी फ्लूच्या गाेळ्या दिल्या एवढीच अाकडेवारी त्यांच्याकडे हाेती. १५ लाख लाेकसंख्येच्या शहरात ६२ रुग्णांना प्रतिबंधक उपचार केल्याचे सांगितल्यावर डाेंगर पाेखरून उंदीर काढल्यागत उपस्थित नगरसेवकांचीही अवस्था झाली. त्यानंतर महापाैरांनी पुन्हा अधीक्षकांना धारेवर धरीत दरराेज नागरी वसाहतीत जाऊन लाेकांची तपासणी करा राेजचा अहवाल कार्यालयाला द्या, अशी तंबी दिली.

अनास्थेचा कळस... माहिती देण्यासही अाळस-
एरवीअनावश्यक बाबींवर उधळपट्टी करणाऱ्या पालिकेच्या दवाखान्यात जेमतेम चार व्हेंटीलेटर सुरू असल्याचे डाॅ. गायकवाड यांनी सांगितले. शहरात स्वाइन फ्लूचा प्रार्दुभाव झाल्यास प्रतिकूल परिस्थितीत जास्तीत जास्त चार रुग्णांवरच उपचार हाेऊ शकतील, अशी धक्कादायक बाब यामुळे उघड झाली. त्यातही दाेन व्हेंटीलेटर अाताच घेतल्याचे त्यांनी सांगितले. दाेन पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय, तर दाेन झाकीर हुसेन रुग्णालयात असल्याचे ते म्हणाले. सिडकाेतील रुग्णावर तातडीची वेळ अाली, तर त्यास जुने नाशिकमध्ये पाठवावे लागते का, असे विचारल्यावर त्यांनी तसे हाेणार नाही इतकेच माेघम उत्तर िदले.