आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लू : 4 दिवसांत 3 महिलांचा मृत्यू, रुग्णांना सिव्हिलमध्येच दाखल करण्‍याचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बदलत्या वातावरणामुळे साथीच्या विकारांत वाढ झाली असताना, स्वाइन फ्लूनेदेखील डोके वर काढले आहे. दिवसांत महिलांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, संशयित रुग्णांना सुरुवातीसच जिल्हा रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
खासगी रुग्णालयात प्रकृती गंभीर झाल्यानंतर वरील मृत रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे अवघ्या तासांत त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे रुग्ण येथे सुरुवातीलाच दाखल झाल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्यता अधिक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
मृत्यू झालेल्या जवळपास १८ रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रारंभीच जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचा मृत्यू होण्याची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे रुग्णास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे आवाहन अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. जी. एस. होले यांनी केले आहे.
वेळीच दक्षता घ्यावी
स्वाइन फ्लूचे बहुतांश रुग्ण प्रथम खासगी रुग्णालयांत उपचार घेतात. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. दक्षता घेत वेळीच त्यांना येथे दाखल करावे. डॉ.जी. एम. होले, अतिरिक्त शल्यचिकित्सक