आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदान झाले तरच करा स्वाइन फ्लूवर उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्वाइन फ्लूचे लक्षण असणाऱ्या रुग्णांवर निदान करता उपचार होत असल्याने स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत अाहेत. खासगी दवाखान्यात नियमित तापावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. या रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे वेळीच निदान झाले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असल्याने या आजाराचा धोका कायम आहे.
जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. खासगी रुग्णालयात तापाच्या आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये किमान एक तरी रुग्णामध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे अाढळून येत आहेत. अशा रुग्णांचे वेळीच निदान करता नियमित उपचार केले जात असल्याने स्वाइन फ्लूचा धोका कायम आहे.
ताप आणि घशाचे विकारांच्या रुग्णांना वातावरणात बदल झाल्याने त्रास होत असल्याचे सांगून अॅलाेपॅथीची औषधे दिली जातात. यामुळे काही रुग्णांना बरे वाटते. स्वाइन फ्लूचे लक्षण असणाऱ्या रुग्णांना आजार बळावतो. अशा रुग्णांवर स्वाइन फ्लूचे वेळीच उपचार सुरू केले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. सामान्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनीदेखील काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

धोका अद्याप कायम; रुग्णांनी काळजी घ्यावी

स्वाइन फ्लूचा धोका अद्याप कायम आहे. सामान्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावेत. स्वाइन फ्लूची लक्षणे असल्यास सरकारी दवाखान्यात उपचार सुरू करावेत. डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक

वातावरण बदलाचा परिणाम नाही

उन्हाळ्यात सर्दी, ताप आणि डोकेदुखीचा त्रास जाणवतो. शीतपेये पिल्याने घशाचा त्रास जाणवू शकतो. मात्र, उपचार घेतल्यानंतर हे आजार दोन दिवसांत बरे होतात. लहान मुले, वृद्ध आणि गरोदर महिलांना याचा प्रादुर्भाव अधिक होतो.

रुग्णांनी घ्यावी काळजी

ताप,सर्दी, घसा दुखणे, रात्रीच्या वेळी ताप येणे, अंग जड पडणे, ताप आल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणे अादी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.