आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची संख्या अकरा, साधुग्राममध्ये तपासले दिवसभरात २२३४ रुग्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्वाइनफ्लूच्या संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मंगळवारी आणखी एक रुग्ण जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये दाखल झाला. दाखल रुग्णांची संख्या आता अकरा झाली आहे. दोन दिवसांपर्वी ही संख्या सात होती. रुग्णांमध्ये सात महिला आणि चार पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये साधुग्राममधील एका साधूचा समावेश आहे.
साधुग्राममधील २० साधूंवर नवीन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील बहुतांशी साधू सर्दी-खोकला, थंडी-तापाने ग्रस्त आहेत. स्वाइन फ्लूचे लक्षण अाढळल्यास रुग्णांना स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्याचा आदेश निवासी शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला. आरोग्य विभागाकडे स्वाइन फ्लूचा मुबलक अौषधसाठा उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या आजाराचे रुग्ण
१३५- अतिसार
२४०- ताप
०१- विषमज्वर
०१- मलेरिया
५२५- सर्दी-खोकला
१३१६- इतर

असा आहे औषधसाठा
३४४०: ३० एमजी
१०९० : ४५ एमजी
२९५८५ : ७५ एमजी
९५ : सिरप ७५ एमजी
३४४४८ : ट्रीपल लेअर मास्क

खबरदारी घ्यावी
सर्दी,खोकला आजारांच्या रुग्णांनी खबरदारी घ्यावी. साधा ताप स्वाइन फ्लूचा नसतो. आजाराबाबत भीती बाळगता वैद्यकीय सल्ला घ्यावा. -डॉ.जी. एम. होले, निवासी शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

स्वच्छतेची कामे तत्काळ करणार
साधुग्राममध्येसाथीचे आजार अस्वच्छतेमुळे पसरणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल. कोठे अस्वच्छता आढळल्यास तत्काळ महापालिका स्वच्छतेचे काम करून घेईल. - जीवनसआनवणे, अतिरिक्त आरोग्याधिकारी, महापालिका