आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूचे दाेन रुग्ण सिव्हिलमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उन्हाळ्यात पावसाळ्याचे वातावरण निर्माण झाल्याने स्वाइन फ्लूसह इतर आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांत स्वाइन फ्लूची लक्षणे असणारे दोन रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले अाहेत. बाह्यरुग्ण विभागातही इतर आजारांची रुग्णसंख्या वाढली अाहे.

पावसाळी वातावरण तयार झाल्याने तसेच थंडी पडत असल्याने लहान मुलांसह वृद्धांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी आणि अतिसार झालेल्या रुग्णांची संख्या वाढली असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात प्राथमिक उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येवरून दिसून आले. आरोग्य विभागाकडून आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुटीच्या दिवशी बाह्यरुग्ण विभागात दोन स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचे नियोजन केले आहे. औषधसाठा मुबलक ठेवण्यात आला आहे. वातावरण बदलामुळे स्वाइन फ्लूचा अाजार बळावण्याची शक्यता अधिक असल्याने काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी केले आहे.