आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : सिडकोत घरमालकावर भाडेकरूचा तलवारीने वार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - भाडेकरूला घर खाली करण्यास सांगितल्याने त्याचा राग येऊन भाडेकरूने थेट घरमालकावर तलवारीने हल्ला केल्याचा प्रकार सिडको भागात घडला.

घरमालक सचिन जगन्नाथ पवार (रा. तोरणानगर) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले की, भाडेकरू दिलीप दंडगव्हाळ यास घरी खाली करावे, असे पवार यांच्या आईने सांगितले असता त्याने वाद घातला पवारांच्या घरात घुसून त्यांच्या आईवर तलवार घेऊन धावला.
पवार हे मध्ये पडल्याने त्यांच्या हातावर तलवारीचा घाव बसला. जखमी पवार यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी दंडगव्हाळला ताब्यात घेतले आहे.