आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात घुसून 2 मुलींसह एका मुलावर कुऱ्हाडीने घाव; हल्‍लेखोर तरुण मनोरुग्‍ण आहे की नाही याची तपासणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडनेरभैरव - नारायणगाव(ता. चांदवड) येथे एका माथेफिरू तरुणाने घरामध्ये अभ्यास करत असलेल्या दोन शाळकरी मुलींसह एका बालकाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत गंभीर जखमी केले. जखमींवर पिंपळगाव नाशिक येथे उपचार सुरू आहेत. आरोपीस वडनेरभैरव पोलिस ठाण्यातून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तो मनोरुग्ण आहे की नाही याबाबत अजून काही निष्पन्न झालेले नाही. 
 
याबाबत वडनेरभैरव पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, नारायणगाव (ता. चांदवड) येथील संतोष गोविंद पवार (वय ३५) हा माथेफिरू तरुण रविवारी (दि. १५) बाबाजी शंकर गांगुर्डे यांच्या घरात रात्री साडेसात वाजेच्या सुमारास अचानक घुसला. आतून कड्या लावून घेत त्याने घरात अभ्यास करत असलेल्या मनीषा बाबाजी गांगुर्डे (वय १२), वैशाली बाबाजी गांगुर्डे (वय १०) समाधान बाबाजी गांगुर्डे (वय ९) यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने वडनेरभैरव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक डॉ. खाडे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण पाटील, कराड, भोये, आहिरे, कल्याण जाधव आदी तपास करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...