आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिम्बायोसिस’मध्ये लज्जतदार ‘कुकिंग शो’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- व्हेज सॅण्डविच, चाट मटोरी, इंडियन चाट, बीट रूट, दहीवडा, निसर्ग भेल, डाळींचे पौष्टिक फ्रेंच फ्राइज अशा एकापेक्षा एक ऑइल फ्री खाद्यपदार्थांच्या मेजवानीने ‘कुकिंग शो’ स्पर्धेत अनोखी रंगत भरली. निमित्त होते ‘सिम्बायोसिस फाउंडेशन डे’च्या वर्धापनदिनानिमित्त सिम्बायोसिस शाळेतील सांस्कृतिक महोत्सवाचे.
स्कूलमध्ये शनिवारी ‘कुकिंग शो’ स्पर्धा पार पडली. या वेळी संस्थेचे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य डॉ. सी. आर. पाटील, प्राचार्या एस. सबरवाल, योगिनी देशमुख, ‘देशदूत’चे कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे आदी उपस्थित होते. ‘कुकिंग शो’ स्पर्धेत शहरातील 10 शाळांतील सुमारे 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
डान्स स्पर्धेने समारोप
सांस्कृतिक महोत्सवांतर्गत पथनाट्य, रांगोळी आणि कुकिंग शो अशा वेगवेगळ्या स्पर्धा पार पडल्या. त्यात शहरातील 15 शाळांतील विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेतला. प्रजासत्ताकदिनी या सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप होणार असून, सायंकाळी इंटर स्कूल डान्स स्पर्धा होईल. ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक र्शीमंत माने प्रमुख पाहुणे राहतील. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल.
सिम्बायोसिस शाळेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पाककृतींचे परीक्षण करताना मान्यवर.