आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंथेटिक ट्रॅक ‘फिनिशिंग लाइन’वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- तब्बल दशकभरापासून ज्या मैदानाची नाशिककर क्रीडापटूंना आणि क्रीडाप्रेमींना आस होती, त्या उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या सिंथेटिक ट्रॅकचे काम ‘फिनिशिंग लाइन’पाशी पोहोचले असून, त्याला ‘फिनिशिंग टच’ दिला जात आहे.
जगभरात नाशिकचा दबदबा निर्माण करणाऱ्या धावपटूंना तसेच फिल्ड इव्हेंटच्या अन्य खेळाडूंना या ट्रॅकमुळे जणू स्वप्नच सत्यात उतरल्यासारखे वाटू लागले आहे. कविता राऊत, मोनिका आथरे, अंजना ठमके, किसन तडवी, दुर्गा देवरे यांच्यासारखे एकाहून एक सर्वोत्तम दर्जाचे खेळाडू निर्माण करणाऱ्या नाशिकमध्ये एकही सिंथेटिक ट्रॅक नसल्याची खंत या धावपटूंना सतावत होती. या सिंथेटिक ट्रॅकच्या निमित्ताने त्यांच्यासारख्या खेळाडूंना आता आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा नाशकातच उपलब्ध झाली आहे. यामुळे प्रत्येक धावपटूला त्याच्या टायमिंगमध्ये सुधारणा घडविण्यासाठी या सिंथेटिक ट्रॅकवरील सरावाचा प्रचंड उपयोग होऊ शकणार आहे. तसेच, या ट्रॅकमुळे भविष्यात नाशकातून अनेक गुणी धावपटू, उंचउडीपटू, लांबउडीपटू तसेच फिल्डचे अन्य इव्हेंटमध्ये वर्चस्व गाजविणारे खेळाडूदेखील निर्माण करणे शक्य होणार आहे. त्याशिवाय, ट्रॅकच्या आतील भागात ११० मीटर बाय ७७ मीटरचे फुटबॉल मैदानही िवकसित करण्यात आले आहे. याचा वापर फुटबाॅल खेळासाठी करता येईल.
पंचवटीत मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात साकारलेला िसंथेटिक ट्रॅक.
मलेशियन तंत्राचा वापर

यामैदानाला आॅस्ट्रेलियन सिंथेटिक ट्रॅकच्या धर्तीवर तयार करण्यात अाले अाहे. त्यासाठी खास मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या ट्रॅकचे लेबर वर्क करण्यासाठीदेखील खास मलेशियातील कामगारांना नाशकात आणण्यात आले होते. तर, ट्रॅकच्या मार्किंगसाठी थेट लंडनमधून तंत्रज्ञ मागविण्यात आले होते.

२००९ ते २०१५ पर्यंतचा प्रवास
नाशकातसिंथेटिक ट्रॅक निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यास २००९ मध्ये प्रारंभ झाला. मात्र, तिथे पूर्वी कचऱ्याचे डंपिंग ग्राउंड असल्याने खूप खालपर्यंत जाऊनही कचराच लागत असल्याने कामाला प्रचंड विलंब झाला. मैदान पूर्ततेसाठी २०११ ची डेडलाइन होती. कॉन्ट्रॅक्टरनी कचरा काढण्याचे काम माझे नसल्याचे सांगत हात वर केल्याने दोनदा कॉन्ट्रॅक्टर बदलावे लागले. अखेरीस कचरा काढून झाल्यानंतर ट्रॅकच्या कामाला प्रत्यक्षात २०१२ मध्ये प्रारंभ होऊन हा प्रकल्प २०१५ मध्ये पूर्णत्वाला आला आहे.

डिसेंबरमध्ये लोकार्पण
पावसाळासुरू असल्याने कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतरच राज्य राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन नाशकात करण्यात आले आहे. त्यात यंदा स्कूल अ‍ॅथलेटिक्सची राष्ट्रीय स्पर्धा नाशकात डिसेंबरअखेर होणार असून, त्याचवेळी लोकार्पण सोहळा होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस आणि अविनाश टिळे यांनी सांगितले.
०८ लेनआहेत ट्रॅकला
४०० मीटरचाट्रॅक
३००० प्रेक्षकांचीखास गॅलरी

साकारला असा ट्रॅक
मैदान पूर्ण होण्याकडेच लागले होते डोळे
मुंबई-आग्रा हायवेने फ्लायओव्हरवरून जाताना मैदान पूर्ण कधी होणार, त्याकडे डोळे लागलेले असायचे. त्यामुळे मैदान पूर्ण झाल्याने अानंद हाेत आहे. त्यामुळे स्वप्नच साकारल्यासारखे मला वाटत आहे. -कविता राऊत, अर्जुनपुरस्कारविजेती धावपटू
सुखद सोमवार
बातम्या आणखी आहेत...