आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रिव्हर ब्रिज’ प्रकल्पाच्या आविष्काराने सारेच थक्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आइस्क्रीमच्या काड्या आणि फेविकॉलच्या माध्यमातून तयार केलेला ‘रिव्हर ब्रिज’ कोणत्याही ‘पिलर’च्या आधाराविना तब्बल 90 किलोहून अधिक क्षमतेचा भार पेलत जातो अन् उपस्थित सर्वच थक्क होतात. सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला सर्वात हलक्या वजनाचा हा ‘रिव्हर ब्रिज’ सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला.
निमित्त होते, मविप्र संचलित कर्मवीर अँड. बाबूराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयोजित ‘टेक युनिक 2014’ या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेचे. गंगापूररोड येथील महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनतर्फे आयोजित या स्पर्धेचे शनिवारी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. या वेळी क्रेडाईचे राज्याध्यक्ष अनंत राजेगावकर, बांधकाम व्यावसायिक अविनाश शिरोडे, मविप्रचे सभापती अँड. नितीन ठाकरे, संजय घुगे, विजय कोठारी, एम. एस. लांबे, प्राचार्य डॉ. जे. टी. पट्टीवार, जयंत भदाणे, सिव्हिल विभागप्रमुख पी. डी. गायकवाड आदी उपस्थित होते. नवनिर्मिती व कौशल्याला मोठा वाव असल्याने तरुणीही या क्षेत्रात मोठय़ा संख्येने येत आहेत.
150 प्रोजेक्टचे सादरीकरण
‘टेक युनिक 2014’ स्पर्धेत 20 महाविद्यालयांनी सहभाग घेतला. त्यात ब्रिज मेकिंग, क्यूब टेस्टिंग, ऑटो कॅड ड्राफ्टिंग, फ्लोटिंग स्ट्रक्चर, पोस्टर पेंटिंग, पेपर बॅग, सायबर शॉट, प्रोजेक्ट प्रदर्शन आदी प्रकारांतील सुमारे 150 प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
‘मविप्र’ संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित सिव्हिल टेक युनिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘रिव्हर ब्रिज’ प्रकल्प अभ्यासताना मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थी. दुसर्‍या छायाचित्रात ‘क्यूब टेस्टिंग’ प्रकल्प.
अत्यंत कमी वजनाचा ब्रिज
नदीच्या दोन टोकांमध्ये कमी अंतर असल्यास त्या ठिकाणी कमी वजनाच्या हलक्या ब्रिजची उभारणी अत्यल्प खर्चात करता येणे शक्य आहे. प्रायोगिक रिव्हर ब्रिज हा 75 सेंटिमीटर इतका आहे. 450 ग्रॅम वजनाचा हा ब्रिज असून, तो तब्बल 50 ते 90 किलोपर्यंतच्या क्षमतेचा भार सहज पेलतो. सागर शिंदे, सिव्हिल इंजिनिअर, द्वितीय वर्ष, मविप्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग