आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समाजकंटकांचा शोध सुरू, धडक कारवाईचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तळेगाव घटनेनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिस प्रशासनाने अतिरिक्त बंदोबस्त ठेवत समाजकंटकांवर कारवाई केली. आंदोलन पेटवणाऱ्यांमध्ये काही राजकीय नेत्यांचा समावेश स्पष्ट झाला अाहे. पाेलिसांनी समाजकंटकांचा शाेध सुरू केला असून, ६८ संशयित पोलिसांना हवे आहेत.
दरम्यान, जेलरोड येथील भीमनगर परिसरात बुधवारी पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न करून सार्वजनिक खासगी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शशिकांत आणि गणेश उन्हवणे या बंधूंसह २१ जणांवर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरुवारी शहरात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर अाले. मात्र, या चार दिवसांमध्ये शहरात दगडफेक, जाळपोळ आणि सामाजिक तेढ निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिक होरपळत होते. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेत समाजकंटकांचा शोध सुरू केला. ३२ संशयितांना शहरातील विविध ठिकाणी अटक केली. पोलिस तपासात ६८ संशयितांची नावे निष्पन्न झाली. पोलिस संशयितांचा शाेध घेत आहे. संशयितांमध्ये काही आजी-माजी नगरसेवकांसह पक्षनेत्यांचा समावेश असल्याने कारवाई करण्यासाठी यंत्रणेवर दबाव वाढत आहे. संशयितांचा शोध घेतला जात आहे.

संशयितांचा शाेध सुरू
^तळेगाव घटनेनंतर घडलेल्या हिंसक घटनांच्या तपासात नावे निष्पन्न झालेल्या संशयितांचा शोध सुरू आहे. लवकरच संशयित पकडले जातील. काही संशयितांची नावे आणि माहिती मिळाली आहे. लवकरच या संशयितांना अटक केली जाईल. -सचिन गोरे, सहायक आयुक्त, गुन्हे
बातम्या आणखी आहेत...