आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात रास्ता रोकाे, काही ठिकाणी बंद, तळेगाव घटनेनंतर तणावाची स्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तळेगाव घटनेच्या निषेधार्थ अांदाेलकांनी महानगर परिसरात विविध ठिकाणी अांदाेलन रास्ता राेकाे केला. नाशिक शहरासह सिडकाे, सातपूर, पंचवटी कारंजा, निमाणी चाैक, द्वारका चाैक, गंगापूरराेड, नाशिकराेड. भगूर देवळाली कॅम्प परिसरातील विविध चाैक, माडसांगवी, अाडगाव येथे अांदाेलन केले. नाशिकराेड येथे अांदाेलकांनी संतप्तपणे घाेषणाबाजी केल्याने काही काळ वातावरणात तणाव हाेता. यामुळे बाजारपेठांतील दुकानेही बंद झाली हाेती. गरवारे चाैक, विल्हाेळी, राजूर फाटा अाणि गाेंदे या भागात तर अांदाेलकांनी काही बस खासगी वाहने पेटवून दिल्याने वाहतूक ठप्प झाली हाेती.
सकाळपासूनच कुठे ना कुठे उद्रेकाच्या घटना घडत असल्याचे वृत्त धडकू लागले. अांदाेलकांनी सातपूरला बस फाेडली, तर पंचवटी कारंजा, निमाणी चाैक, अाडगाव तसेच माडसांगवीला ठिय्या अांदाेलन रास्ता राेकाे केला. गंगापूरराेड परिसरात प्रसाद कार्यालय चाैकात अांदाेलकांनी निषेधाच्या घाेषणा देत अाराेपीच्या पुतळ्याला प्रतीकात्मक फाशी दिली.

अफवांकडे दुर्लक्ष करा, संयम राखा
तळेगावघटनेनंतर निर्माण झालेला तणाव लवकरात लवकर निवळण्यासाठी नागरिकांनी काेणत्याही अफवांवर विश्वास ठेवता संयम राखावा. समाजकंटकांवर कठाेर कारवाई करण्याबराेबरच सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी पाेलिस दल सिद्ध अाहे. -डाॅ. रवींद्र कुमार सिंघल, पाेलिसअायुक्त


बहुतांश शाळा, काॅलेजला सुटी
तळेगावघटनेच्या निषेधार्थ अांदाेलन सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील बहुतांश शाळा महाविद्यालयांना साेमवारी (दि. १०) सुटी जाहीर करण्यात अाली अाहे. मंगळवारी (दि. ११) दसऱ्याची तर बुधवारी (दि. १२) माेहरमची सुटी असल्याने सलग तीन दिवस शाळांना सुटी राहाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...