आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापाच्या उद्रेकाचा जिल्हाभरात वणवा, पाेलिस अधीक्षकांसह ३४ कर्मचारी जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - त्र्यंबकेश्वर तालुक्यात तळेगाव येथील पाच वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ संतप्त जमावाने रविवारी सकाळी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर चार तास रास्ता राेकाे केला. तेथे जाऊन अांदाेलनकर्त्यांना संयम राखण्याचे अावाहन करणाऱ्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याच निषेधार्थ घाेषणाबाजी सुरू झाली अन‌् अांदाेलनाला हिंसक वळण लागले. पाेलिसांवर तुफान दगडफेक करून अांदाेलनकर्त्यांनी पाेलिसांची तीन वाहने पेटवून देत बसेससह इतर सात ते अाठ वाहनांच्या काचाही फाेडल्या. ठिकठिकाणी दगडफेकीत पोलिस अधीक्षकांसह ३४ कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर पाेलिसांनी साैम्य लाठीमार केला, जमाव आटोक्यात येत नसल्याने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
बहुतांश शाळा, महाविद्यालयांना सुटी
बहुतांशशाळा, महाविद्यालयांना आंदोलनांमुळे खबरदारी म्हणून सोमवारी (दि.१०) सुटी देण्यात आली आहे. दसऱ्यामुळे मंगळवारी (दि.११) तर मोहरममुळे बुधवारी (दि.१२) सुटी राहील.

पाडळी फाट्यावर रात्री पाेलिसांचा गाेळीबार
मुंबई- अाग्रा महामार्गावर अांदाेलकांनी रविवारी रात्री वाजता पाडळी फाट्याजवळ रास्ता राेकाे करण्याचा प्रयत्न केला. अालेल्या पाेलिसांवर दगडफेक केली. रात्री १०.१५ च्या सुमारास जादा कुमक तेथे पाेहाेचली. त्यांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्या फाेडल्या नंतर हवेत गाेळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.

मुंबई | तळेगाव अंजनरी येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेप्रकरणी तपास वेगाने पूर्ण व्हावा. अाराेपपत्र लवकर दाखल हाेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि आरोपींना कडक शासन करावे, अशी मागणी िवराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली अाहे. शेगाव येथे पत्रकारांशी बाेलताना ते म्हणाले की, या घटनेनंतर नाशिकमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती मी स्थानिक कार्यकर्त्यांकडून घेतली. नंतर फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून संयम राखण्याचे अावाहन
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनाही घटनेचे वृत्त समजताच त्यांनी तळेगाव फाट्यावर घटनास्थळी थांबून अांदाेलकांशी चर्चा केली. समजूत घालण्याचा प्रयत्न करताना त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून संतप्त जमावाच्या भावना त्यांच्यापर्यंत पाेहाेचविल्या. पडसाद नाशिक-मुंबई मार्गावरील विल्हाेळी, गाेंदे, वाडीवऱ्हे येथे उमटून एसटी महामंडळाच्या सहा बसेस पेटविण्यात अाल्या. शहरातही ठिकठिकाणी रास्ता राेकाे, दगडफेक, जाळपाेळीच्या घटना घडल्या. दरम्यान, दुपारनंतर पाेलिसांनी माेठ्या प्रमाणात फाैजफाटा तैनात करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळी वाजताच पालकमंत्री महाजन नाशकात दाखल झाले. त्यांनी तातडीने पीडित कुटुंबीयांची जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पाठाेपाठ तळेगाव येथेही घरी जाऊन कुटुंबीयांची ग्रामस्थांची भेट घेतली. त्यानंतर पाेलिस अधीक्षक अंकुश शिंदे अायुक्त रवींद्र सिंघल यांना बंदाेबस्ताबराेबर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे अादेश दिले. तळेगाव येथील पाच वर्षांच्या बालिकेवर १५ वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस अाली हाेती. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पाेलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. या घटनेचे वृत्त समजताच रात्रीच तळेगाव येथे संशयिताच्या घरावर हल्ला करीत वातावरण तणावपूर्ण बनले हाेते. रविवारी सकाळी वाजेपासूनच संशयिताला फाशी देण्याच्या मागणीसाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यावर शेकडाेंच्या संख्येने जमावाने रास्ता राेकाे केला.

जि. प. माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, ‘छावा’चे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, मनसेचे तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले यांच्यासह स्थानिक लाेकप्रतिनिधींनी अांदाेलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. या अांदाेलकांना समजावण्यासाठी पालकमंत्री महाजन घटनास्थळी पाेहाेचले. मात्र, अांदाेलकांमधील काहींनी त्यांना बाेलण्यास विराेध केला, तर काहींनी त्यांच्याविराेधातच घाेषणाबाजी केल्याने नाइलाजास्तव त्यांना घटनास्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. त्यापाठाेपाठ विशेष पाेलिस महानिरीक्षक विनय चाैबे, अधीक्षक अंकुश शिंदे यांनी अांदाेलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही अांदाेलकांकडून घाेषणाबाजी सुरूच हाेती. अाराेपीला फाशी द्या, अन्यथा अामच्या ताब्यात द्या, अशी भूमिका घेतली. त्याचवेळी अामदार सीमा हिरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनीही जमावाला शांततेचे अावाहन केले. या सगळ्या घडामाेडी सुरू असताना त्यातच काेणी घटनेचे राजकारण करू नका, असे म्हणत अचानक गाेंधळ सुरू झाला. त्याचवेळी चाैबे यांच्या कारवर बसवर दगडफेक करून काचा फाेडल्या. जमावाने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या डाेंगराकडे पळ काढून तेथून पाेलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. तरीही पाेलिसांनी संयमाची भूमिका ठेवत बचाव केला. परंतु, काही अांदाेलनकर्त्यांनी पाेलिसांच्याच माेठ्या व्हॅनसह, सुमाे, जीपला लक्ष्य करीत पेटवून दिल्या. अागीचे लाेट वाढत गेल्याने सर्वत्र पळापळ झाली. अखेरीस पाेलिसांनी जमावाला नियंत्रणासाठी हवेत अाठ ते दहा अश्रुधूराची नळकांडी फाेडल्याने जमाव पांगला. तरीही जमावाकडून पाेलिसांवर दगडफेक झाल्याने त्यात अधीक्षक शिंदे यांच्यासह अपर अधीक्षक प्रशांत माेहिते, वरिष्ठ निरीक्षक किशाेर नवले, सहायक निरीक्षक गिरी, सुहास राऊत यांच्यासह ३४ कर्मचारी जखमी झाले. अनेक जण डाेके, हातापायाला दगड लागल्याने जखमी झाले. पाेलिसांनीही साैम्य लाठीमार सुरू केल्यानंतर जवळपास तासभरानंतर निवळला.
शांतता सलाेखा कायम राखा : पवार
मुंबई | तळेगावच्या घटनेनंतर राज्य सरकारने घेतलेल्या त्वरीत चाैकशीच्या भूमिकेचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी स्वागत केले. काेणीही कायदा हातात घेऊ नये. तीव्र संताप असला, तरीही सर्वांनी शांतता, सलाेखा कायम राखावा, असे अावाहनही त्यांनी केले.

१५ दिवसांत चार्जशिट दाखल करू : पालकमंत्री
नाशिक | तळेगावच्या घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळीच पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले. जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित बालिकेची चाैकशी करून डाॅक्टरांशी चर्चा केली. येत्या पंधरा दिवसांत चार्जशिट दाखल हाेईल, अशी ग्वाही महाजन यांनी यावेळी अांदाेलकांनादिली. त्यानंतर त्यांनी तळेगावला भेट िदली. ग्रामस्थांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता संतप्त जमाव काहीही एेकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याने त्यांना मागे फिरावे लागले. त्यानंतर नाशिकमध्ये विश्रामगृहावर तळ ठाेकत त्यांनी िजल्हाधिकारी राधाकृष्णन बी., निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर, पाेलिस अधिकारी लाेकप्रतिनिधींशी चर्चा केली.

दिवसभर ते परिस्थिती नियंत्रणात अाणण्यासाठी प्रयत्न करत हाेते. दरम्यान, या प्रकरणातील दाेषीला पाेलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर फास्ट ट्रॅक काेर्टात खटला चालविला जाईल. याबाबत अॅड. उज्ज्वल निकम यांच्याशीही अापण चर्चा केली असून, येत्या पंधरा िदवसांत चार्जशिट दाखल हाेईल, अशी ग्वाही महाजन यांनी त्यांना भेटण्यासाठी विश्रामगृहावर अालेल्या संतप्त अांदाेलकांच्या एका गटाला दिली.

भावनांचा उद्रेक... अन् सामाजिक सलोख्याचा आदर्श
तळेगाव-अंजनेरीचा परिसर संतापाने धुमसत असताना नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे दर्शनासाठी चाललेल्या या महिला येथील क्लेशदायी वातावरणाने व्यथित झाल्या. संतापाच्या वणव्यातही त्यांनी येथे उतरून दुर्गासप्तशती वाचून शांतता तसेच सामाजिक सलोखा नांदण्यासाठी प्रार्थना करत एक उत्तम आदर्श दाखवून दिला.

पालकमंत्र्यांच्या भेटीनंतरही जमावाच्या संतापाचा उद्रेक काही केल्या शमत नव्हता. काहीजणांनी दगडफेक सुरू केल्याने पोलिसांजवळ असा दगडांचा खच जमा झाला होता. जमावाला आटोक्यात आणण्यासाठी शेवटी पोलिसांना सौम्य लाठीमार अश्रुधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा जाळपोळीचे सर्व फोटो...
बातम्या आणखी आहेत...