आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tata Institute Of Social Sciences Set Up The First Skill Development University

‘गोएसो’ उभारणार पहिले कौशल्य विकास विद्यापीठ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शैक्षणिक संस्थांमध्ये बडे प्रस्थ असणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीला २०१९ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त डहाणूमध्ये १०० एकरावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या मदतीने देशातील पहिले कौशल्य विकास विद्यापीठ उभारून संस्था शतकपूर्ती साजरी करणार आहे.
या विद्यापीठांतर्गत विविध क्षेत्रांतील व्यवसायाधारित रोजगारभिमुख शिक्षण दिले जाईल. यामध्ये तब्बल १०८ देशांच्या शैक्षणिक संस्था प्रशासन सहभागी होतील. येथून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत बेकारी आणि बेरोजगारीचा सामना करावा लागू नये, हा विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश आहे. उत्पादन, निर्यात, दळणवळण, सरळ सेवा, यांत्रिकी शिक्षण आदी गोष्टी केंद्रस्थानी ठेवून शिक्षण दिले जाणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याने अभ्यासक्रमावर येत्या दोन वर्षांत शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या, अभ्यासक्रमाचे प्रकार, कालावधी आदी गोष्टींची माहिती दिली जाईल. सध्या १०० एकर जागेवर विद्यापीठ उभे करणे हा संस्थेचा मानस आहे.

माजी विद्यार्थ्याची कल्पना : संस्थेचेमाजी विद्यार्थी युनिव्हर्सल ग्रुपचे सीईओ प्रशांत खंबसवाडकर यांनी काही वर्षे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये काम केले. त्यांच्या कल्पनेतून हे विद्यापीठ उभे राहाणार आहे. ज्यांनी घडवले त्या संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त कृतज्ञता म्हणून हा पर्याय शोधला असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे १००वे वर्ष देशासाठी अर्पित असून, ते अजरामर व्हावे ही इच्छा त्यांनी बोलून दाखविली.

‘गोएसो’ उभारणार देशातील पहिले कौशल्य विकास विद्यापीठ
आदीगोष्टी केंद्रस्थानी ठेवून शिक्षण दिले जाणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याने अभ्यासक्रमावर येत्या दोन वर्षांत शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या, अभ्यासक्रमाचे प्रकार, कालावधी आदी गोष्टींची माहिती दिली जाईल. सध्या १०० एकर जागेवर विद्यापीठ यंत्रणा उभी करणे हा संस्थेचा मानस आहे.

माजी विद्यार्थ्याची कल्पना
संस्थेचे माजी विद्यार्थी युनिव्हर्सल ग्रुपचे सीईओ प्रशांत खंबसवाडकर यांनी काही वर्षे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये काम केले. त्यांच्या कल्पनेतून हे विद्यापीठ उभे राहाणार आहे. ज्यांनी घडवले त्या संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त कृतज्ञता म्हणून हा पर्याय शोधला असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे १००वे वर्ष देशासाठी अर्पित असून, ते अजरामर व्हावे ही इच्छा त्यांनी बोलून दाखविली.

कॅनडाकडून होणार प्रशिक्षणाची तरतूद
जगभरातील १०८ देशांतील विविध प्रशिक्षणे विद्यापीठात दिली जातील. कॅनडामध्ये परिचारिकांची अत्यंत कमतरता असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना हे शिक्षण त्यांच्या पद्धतीने देऊन तेथील हॉस्पिटल्समध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल.

अत्यंत कमी शिक्षण शुल्क
विद्यार्थ्यांकडून फक्त विद्यापीठातील शैक्षणिक साहित्य वापरापुरते शुल्क घेतले जाईल. देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी विद्यापीठ काम करणार आहे.