आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांना ‘तत्काळ’ तिकीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - रेल्वेने तत्काळ आरक्षणाच्या नियमात मंगळवारपासून केलेल्या बदलामुळे रांगेत उभ्या असलेल्या सर्व प्रवाशांना नवीन नियमाच्या अंमलबजावणीचा अनुभव आला. रांगेतील प्रत्येकाला तिकीट उपलब्ध झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेने तत्काळ तिकीट आरक्षण योजना सुरू केली होती. मात्र त्याचा फायदा दलाल व काळाबाजार करणारे घेत असल्याचे लक्षात आल्यावर प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली.
सोमवारपासून सकाळी 8 वाजेऐवजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत आरक्षण मिळणार आहे. या वेळेत कोणत्याही अधिकृत एजंटला तिकीट मिळणार नाही. प्रवासाच्या एक दिवस अगोदर बुकिंग करता येणार असून, फक्त तीन तिकिटे व त्यासाठी ओळखपत्र आवश्यक आहे, प्रवासाचे कारण बंधनकारक करण्यात आले आहे.
रांग लावण्याची गरज नाही
सध्या लग्नसराईची गर्दी नाही. शाळा सुरू झाल्याने त्या दोन्ही कारणांनी रेल्वेला होणारी गर्दी नाही. त्यामुळे आरक्षणाची मागणी कमी आहे. हंगामात तत्काळ आरक्षणासाठी 300 ते 400 प्रवासी रांगेत उभे राहतात. काल अवघे 30 ते 35 प्रवासी रांगेत उभे होते. त्या सगळ्याच प्रवाशांना तिकीट मिळाले. व्ही. एन. धनगर, तिकीट आरक्षण निरीक्षक
स्वतंत्र खिडक्या - नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आरक्षण तिकिटासाठी चार खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी एक नंबरच्या खिडकीवर वृद्ध व महिलांसाठी तर इतर ठिकाणी सर्वांना आरक्षण तिकीट देण्यात येते.