आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७० दिवसांत १२८ काेटींच्या करवसुलीचे माेठे अाव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापाैरांनी अाठवड्यातून एक दिवस म्हणजे दर मंगळवारी पाणीकपात जाहीर केल्यानंतर भाजप अामदारांकडून सुरू झालेला विराेध बघता या राजकीय भांडणात अडकण्यापेक्षा वस्तुनिष्ठ निर्णय घेण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून अाजअखेर शिल्लक पाणीसाठा किती, याची माहिती जलसंपदा खात्याकडून अायुक्तांनी मागवली असून, शिल्लक पाणीसाठा त्याप्रमाणे ३१ जुलैपर्यंत येणाऱ्या कालावधीचा हिशेब करून नेमकी किती पाणीकपात करायची, याबाबत येत्या दाेन दिवसांत निर्णय हाेण्याची शक्यता अाहे.
गेल्या महिनाभरापासून पाणीकपातीच्या मुद्यावरून भाजप विरुद्ध उर्वरित राजकीय पक्षांमध्ये जाेरदार कुरघाेडीचे राजकारण सुरू अाहे. पालकमंत्र्यांच्या दाव्यानुसार मुबलक पाणी असून, ३१ जुलैपर्यंत नाशिककरांना सहज पाणी पुरेल. याउलट, पालिकेच्याच पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार सद्यस्थितीत ज्या प्रमाणात पाणीपुरवठा सुरू अाहे, तसाच कायम राहिला, तर जूनअखेरीस पाणीपुरवठा संपुष्टात येईल. त्यामुळे सध्या सुरू असलेली १५ टक्के कपात तशीच सुरू ठेवून अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले, तर हेच पाणी १० जुलैपर्यंत पुरू शकेल. म्हणजेच २० दिवसांची तूट असेल. अाठवड्यातून दाेन दिवस कपात केली, तर मात्र सप्टेंबरपर्यंत म्हणजेच ३१ जुलैनंतर नऊ दिवस अतिरिक्त पाणी उरेल. दरम्यान, या अाकडेवारीनुसार महापाैरांनी अाठवड्यातून एक दिवस म्हणजे मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शहरावरील पाणी संकट लक्षात घेता, त्यास नाशिककरांकडून फारसा विराेध झाला नाही. दरम्यान, भाजप अामदारांनी पुन्हा कपातीची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर कपातीचे नेमके काय हाेणार, असा प्रश्न निर्माण झाला. यासंदर्भात प्रशासकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी जलसंपदा खात्याकडून शिल्लक पाणीसाठ्याची माहिती मागवली असून, त्यानुसार अाठवड्यातून एक दिवस पाणीकपात करायची की नाही, याबाबत अंतिम निर्णय हाेणार अाहे.

पाणीपट्टीचे तब्बल ४३ काेटी अडचणीत
शहरात लाख ७३ हजार ५११ नळजाेडणीधारक असून, त्यांच्याकडून ४२ काेटी ८४ लाख रुपयांची ३१ मार्च २०१५ अखेर थकबाकी हाेती. त्यापैकी काेटी ४४ लाख रुपये वसूल झाले असून, सन २०१५-१६ या वर्षातील २३ काेटी ८३ लाख रुपयांची मागणी लक्षात घेता हा अाकडा ६६ काेटी ६८ लाखांपर्यंत पाेहोचला अाहे. त्यापैकी जवळपास २३ काेटी १९ लाख रुपये वसूल झाले असून, ४३ काेटी ४९ लाख रुपयांच्या वसुलीचे अाव्हान अाहे.

महापालिकेत अार्थिक खडखडाट असताना घरपट्टी पाणीपट्टीपाेटी मिळणाऱ्या जवळपास १२८ काेटी रुपयांचे उत्पन्न वसूल हाेण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहे. अार्थिक वर्ष संपण्यासाठी ७० दिवस बाकी असून, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण बघता ही वसुली कशी हाेणार, या भीतीने अधिकारीच त्रस्त झाल्याचे समजते.

घरपट्टी वसुलीसाठीच्या सवलत याेजनेनुसार एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱ्यांना टक्के, मे महिन्यात ३, तर जूनमध्ये टक्के सवलत देण्यात अाली. त्यामुळे ३५ काेटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले. याेजना बंद झाल्यावर वसुलीचे अाकडे मंदावू लागले. पालिकेच्या रेकॉर्डवर लाख ८० हजार ३४५ मिळकती असून, त्यांच्याकडे ७६ काेटी ८७ लाखांची ३१ मार्च २०१५ पर्यंत थकबाकी अाहे. त्यापैकी १६ काेटी ६५ लाखांची वसुली झाली असून, सन २०१५-१६ या अार्थिक वर्षात ६९ काेटी ७५ लाख वसुलीचे उद्दिष्ट अाहे. दाेन्ही मिळून १४६ काेटी रुपयांची वसुली अपेक्षित असून, २० जानेवारीपर्यंत जेमतेम ६१ काेटी लाख रुपये वसूल झाले अाहे. उर्वरित ८५ काेटी ४९ लाख रुपयांची घरपट्टी वसुलीचे येत्या ७० दिवसांत माेठे अाव्हान असेल.
घरपट्टीपाेटी७७३ जप्ती वारंट : महापालिकेने७७३ घरपट्टी थकबाकीदारांना स्थावर मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात वॉरंट काढले अाहे. त्यानंतर २१ दिवसांत थकबाकी भरल्यास संबंधित वस्तू जप्तीची कारवाई हाेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.