आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाॅनलाइन प्रणालीद्वारे पालिकेत टीडीअार बँक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात किती टीडीअार उपलब्ध अाहे, किती लाेकांकडे टीडीअार उपलब्ध अाहे याची एकत्रित माहिती अाता टीडीअार बँकेद्वारे उपलब्ध हाेणार अाहे. यामुळे टीडीअारच्या नावाखाली हाेणाऱ्या गैरप्रकारांना लगाम लागणार अाहे. संगणक विभागाने ऑनलाइन बांधकाम परवानगी देण्याबाबतचा कोटी ३३ लाख रुपये खर्च असलेला प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमाेर सादर केला हाेता. या प्रस्तावात टीडीअार बँकेची तरतूद असून, प्रस्तावाला ‘स्थायी’त मंजुरी देण्यात अाली.
भूसंपादित केलेल्या जागेच्या बदल्यात अार्थिक माेबदला दिला जाताे वा जागेचा टीडीअार दिला जाताे. अनेक वेळा टीडीअार उपलब्ध अाहे किंवा नाही, याची शहानिशा करताच टीडीअारची तरतूद केली जाते. त्यातून भविष्यात वाद निर्माण हाेण्याचे अनेक अनुभव अाहेत. या पार्श्वभूमीवर टीडीअारच्या उपलब्धतेबाबत पारदर्शकता अाणण्यासाठी टीडीअार बँक सुरू करण्याची तरतूद अाॅटाे डीसीअारच्या माध्यमातून करण्यात अाली अाहे. यामुळे टीडीअारच्या नावाने केल्या जाणाऱ्या बनवाबनवीला अाळा बसू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात अाहे. याशिवाय, या प्रस्तावानुसार महापालिका क्षेत्रात बांधकाम परवानगी, पूर्णत्वाचा दाखला, अभिन्यास मंजुरीसह अन्य नानाविध परवानग्या अाॅनलाइन मिळू शकणार अाहेत. महापालिकेच्या कामकाजात सर्वसामान्याची काेठेही अडवणूक होऊ नये, यासाठी सदर संगणकीकृत व्यवस्था कार्यान्वित करण्यात येणार अाहे. हे काम सॉफ्टटेक इंजिनिअरिंग प्रा.लि. यांच्याकडून करून घेण्यात येणार अाहे.
अाताप्रतीक्षा विकास नियंत्रण नियमावलीची : विकासनियंत्रण नियमावलीनुसार अाॅटाे डीसीअारमध्ये माहिती उद‌्धृत केली जाणार अाहे. मात्र, नवीन नियमावलीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे अद्याप प्रलंबित असल्याने अाॅटाे डीसीअारचा उपयाेग तातडीने हाेऊ शकणार नाही. या नियमावलीला मंजुरी मिळाल्यानंतरच अाॅटाे डीसीअार पद्धती सर्वसामान्यांसाठी उपयाेगी ठरू शकेल.
{ इमारत अाराखडा मंजुरी प्रस्तावाच्या प्रत्येक टप्प्याची माहितीची उपलब्धता
{ अर्जदारांकरिता पारदर्शक सुलभ अशी इमारत अाराखडा मंजुरी प्रस्ताव याेजना
{ ड्राइंगव्दारे इमारत अाराखडा प्रस्तावाची स्वयंचलित छाननी प्रक्रिया
{ बांधकाम नकाशा मंजुरी प्रक्रिया कम्प्लिशन जलदगतीने हाेणार
{ मंजुरी प्रक्रिया प्रत्येक टप्प्यावर संबंधितांना एसएमएस इमेलने कळविली जाणार
{ नगररचना विभागाकडून साइट व्हिजिटची वेळ तारीख एसएमएसने कळविली जाणार
{ अग्निशामक दलाचे नारहरकत दाखल्याची मंजुरी प्रक्रिया अाॅनलाइन हाेणार
{ सर्व प्रकारचे शुल्क अाॅनलाइन भरण्याची सुविधा
{ परवानग्या अाणि नाकारल्याचे पत्र या बाबी अाॅनलाइनवर मिळणार

अशी अाहे प्रणाली
{इमारत अाराखडा मंजुरीकरिता अर्ज नकाशे अाॅनलाइन सादर करण्याची सुविधा
{ अाॅनलाइन नकाशा सादर झाल्यानंतर नकाशाची नियमानुसार तपासणी करून नकाशा नियमानुसार अाहे किंवा नाही, याबाबत सुरक्षा अहवाल प्राप्त हाेणार
{ नकाशाचे फ्लाेअर एरिया कॅलक्युलेशन एफएसअायबाबतची तपासणी संगणकीय कार्यप्रणालीद्वारे हाेणार { माैजे वडाळा येथील सर्व्हे क्रमांक ५० (पै) मधील १८ मीटर रुंद रस्त्याच्या भूसंपादनासाठी काेटी लाख २४ हजार ४८० रुपये खर्चाचा भूसंपादन प्रस्ताव
{ माैजे देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक १२/३ (पै) मील चिल्ड्रेन प्ले ग्राउंड १२ मीटर रुंद रस्त्यातील बाधित क्षेत्राच्या भूसंपादनासाठी ११ लाख ६३ हजार ९२२ रुपये खर्चास मंजुरी
{ सर्व्हे क्रमांक २९४ मधील १२ मीटर रस्त्याच्या भूसंपादनासाठी काेटी १५ लाख ५० हजार २२४ रुपयांच्या खर्चास मंजुरी
{ पिंपळगाव बहुला शिवारातील सर्व्हे क्रमांक १९३ पैमधील शाळेसाठी अारक्षित असलेल्या क्षेत्रावर भूसंपादन करणे
{ कामटवाडे सर्व्हे क्रमांक ३४/३ मधील १८ मीटर राेडकरिता बाधित ३५५.५० चाैरस मीटर अारक्षित जागेचे भूसंपादन करणे
{ पालिकेच्या हद्दीतील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याच्या कामासाठी काेटी २० लाख खर्चास मंजुरी देणे
{ सर्व्हे क्र. २८९/१ पैमधील १८ मीटर रस्त्याकरिता ९९० चाैरस मीटर बाधित क्षेत्र अारक्षित करणे
{ सर्व्हे क्र. ८०९/२ मधील क्षेत्राचे भूसंपादन करणे
बातम्या आणखी आहेत...