आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीडीअारप्रश्नी महाराष्ट्रदिनी महाअांदाेलन, अामदारांचे अाश्वासन अद्यापही अधांतरीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - टीडीअारप्रश्नी शहरात काढलेल्या महामाेर्चाला महिना पूर्ण झाला तरीही या माेर्चानंतर लाेकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांसाेबत बैठक अायाेजित करून नाशिकचा हा प्रश्न मार्गी लावण्याचे दिलेले अाश्वासन अधांतरीच अाहे. अशी बैठक अद्यापही अामंत्रित केली नसून, हा प्रश्न लवकर निकाली निघाल्यास येत्या मे राेजी महाराष्ट्रदिनी महाअांदाेलन छेडण्याची तयारी स्थापत्य महासंघाने सुरू केली अाहे.
नव्या टीडीअार धाेरणात अाणि ७.५ मीटरच्या रस्त्यांवर टीडीअार मिळणार नसून, यातून शेकडाे छाेटे बांधकाम व्यावसायिक, बांधकाम व्यवसायावर अाधारित अार्किटेक्ट, इंजिनिअर्स, कन्सल्टंट, त्यांच्याकडील कर्मचारी यांच्यासह या रस्त्यावर भूखंड किंवा फ्लॅट असलेले रहिवासी प्रभावित हाेेणार अाहेत. यामुळे या धाेरणाला विराेध करण्यासाठी महासंघाने गत महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालय अाणि पालिकेवर महामाेर्चा काढत सरकारचे लक्ष वेधले हाेते. या माेर्चासमाेर मार्गदर्शन करताना आमदार सत्ताधारी भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आपल्याला लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक करून देण्याचे या आंदोलनात सर्व आमदार शहरवासीयांच्या बाजूने असल्याचे सांगितले होते. पण, पाठपुरावा करूनही आजवर सानप यांच्याकडून बैठकीची वेळ महासंघाला मिळालेली नाही.

याचिकेवर अाज हाेणार सुनावणी
महासंघाने याप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर पहिली सुनावणी सोमवारी होत आहे. सोलापूरचे वास्तुविशारद बिराजदार मनसेचे गटनेते अनिल मटाले यांच्या याचप्रश्नी दाख‌ल याचिकेवर गुरुवारी (दि. २१) सुनावणी होत आहे.

अाठवडाभरात दिलासा मिळाल्यास महाअांदाेलन
^येत्या आठवड्यात दिलासा मिळाला नाही तर महाराष्ट्र दिनाच्या आसपास असे महाआंदोलन करण्याचा विचार आहे. भूतो भविष्यती असे या आंदोलनाचे स्वरूप निश्चितच असेल. - विजय सानप, अध्यक्ष,स्थापत्य महासंघ

विविध शहरांतून अांदाेलनाला पाठिंबा
नाशिकमध्ये बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी एकत्र येत स्थापत्य महासंघ स्थापून राज्य सरकारचे टीडीअारप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी अांदाेलनाची उभारणी केली अाहे. याची दखल इतर शहरातील व्यावसायिक नागरिकांनी घेतली ते या अांदाेलनाला जोडले जात आहेत. यात नागपूर, ठाणे, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, जळगाव इतर अनेक शहरांतून अांदाेलनाला पाठिंबा मिळत आहे.