आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकदिनी पतीकडून शिक्षक पत्नीवर हल्ला, पतीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक, सिडको- एकीकडे शिक्षकदिन साजरा होत असताना, जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षिकेच्या डोक्यात तिच्या पतीने धोपटणे मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बघून शेजारच्यांनी धाव घेतली असता संशयित पतीने घराच्या टेरेसवर जाऊन उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली.
या घटनेत बापू पुंजू खैरनार (वय ४५) याचा मृत्यू झाला आहे, तर त्याची पत्नी सीमा बापू खैरनार (४०, रा. ओम रेसिडेन्सी, पाथर्डी फाटा) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिस शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू खैरनार हा कुठलाही व्यवसाय करीत नसल्याने वारंवार पत्नीकडे पैशांची मागणी करून वाद घालायचा. यातूनच शुक्रवारी सकाळी त्यांच्यात भांडण झाले त्याचे पर्यवसान वरील घटनेत झाले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडली ती पाथर्डी फाटा येथील ओम रेसिडेन्सीची ही इमारत.
परिसरात हळहळ
सीमाखैरनार या इगतपुरी येथील आडाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. मूळचे धुळे जिल्ह्यातील नरडाणे येथील खैरनार कुटुंबीय आहे. या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.