आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ध्यान पुस्तकी, हात राहो मस्तकी, विविध उपक्रमांद्वारे साजरा झाला शिक्षकदिन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विद्यार्थी शिक्षकांच्या, तर शिक्षक विद्यार्थ्यांच्या भूमिकेत, कुठे आदर्श शिक्षकांचा गौरव तर कुठे शिक्षकांची सांगितली जाणारी महती... अशा विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
नाशिकरोड, रोटरी क्लब, नाशिक व्हिजन नेक्स यांच्यातर्फे रोटरीच्या पदाधिकारी सुमित्रा गुप्ता यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण झाले. नाशिक व्हिजनचे अध्यक्ष दिनेश शहा अध्यक्षस्थानी होते. शिक्षक लता पवार, भरत भालेराव, शोभा चव्हाण, राहुल खिलारी, मुग्धा जोशी, कौसर आझाद, कृष्णा राठी यांना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रेणुका जोशी यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन केले. मोहन भावे यांनी आभार मानले. सोमनाथ भट्टड,हृषीकेश मराळकर, शिवकुमार शर्मा, नंदकुमार राठी, संध्या भट्टड, मीना जगताप, उषा शहा व डॉ.जितेंद्र सुराणा यांनी संयोजन केले.
शिक्षक हाच गुरू : नांदुरकर
भगूर शिक्षण मंडळाच्या नूतन प्राथमिक विद्यामंदिर येथील कार्यक्रमात मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्या हस्ते मुख्याध्यापक सुभाष वाणी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर गोडसे उपस्थित होते. कार्यक्रमास यू. पी. कुलकर्णी, शालिनी आंबेकर, मंदाकिनी शिंदे, प्रमिला इमानदार, काशीनाथ साळवे आदी उपस्थित होते.

समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान
मूल्यसंस्कारांचे धडे देऊन उद्याची पिढी आदर्श घडविणारे शिक्षकांचे समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांची देशाला गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डी. के. पाटील यांनी केले.
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत शिक्षकदिन साजरा करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रंथपाल अनिल पाटील, अधीक्षक गिरीश पाटील, सुनीता महाले, शुभांगी बिचेवार, चैताली परदेशी, दर्शना शिंदे, श्वेता भावसार, मनीषा पानगव्हाणे, वर्षा निकम, छाया टर्ले आदी उपस्थित होते.