आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांना अाॅगस्टचे मानधन अदा; सप्टेंबरचेही मिळेल, पुढे प्रश्न कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेतर्फे अल्पसंख्याक समाजासाठी सुरू करण्यात आलेल्या या उर्दू शाळांमध्ये दहा वर्षांपासून फक्त दोनच शिक्षक चार वर्ग सांभाळत असल्याने येथील विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याची बाब डी. बी. स्टारने १० ऑगस्टला वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अामदार देवयानी फरांदे यांच्या सूचनेनुसार या शाळेत मानधनावर शिक्षक नेमण्यात अाले. त्यांचे दाेन महिन्यांचे मानधनही फरांदे यांनी देण्याचे अाश्वासन दिले. त्यानुसार नुकतेच एक महिन्याचे मानधन अदा करण्यात अाले. अाता प्रश्न असा अाहे की, दाेन महिन्यांनंतर पुन्हा विद्यार्थी वाऱ्यावर असणार का? मानधनावरील शिक्षकांचे मानधन काेण देणार? की पुन्हा एकाच शिक्षकावर येणार जबाबदारी, यामुळे पालक चिंतेत अाहेत.
‘दिव्य मराठी’त या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालकांनी या शाळेत शिक्षक तत्काळ शिक्षक नेमण्याची मागणी प्रशासनाधिकाऱ्यांकडे केली. मात्र, वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष हाेत असल्यामुळे १८ अाॅगस्टला पालकांनी विद्यार्थ्यांना सामूहिकरीत्या शाळेतून काढण्याचे आंदोलन केले हाेते. यानंतर या शाळेत शिक्षक नेमणूक करण्यासाठी प्रशासनाधिकाऱ्यांकडून पावले उचलण्यात अाली. वडाळागावातील महापालिकेच्या उर्दू शाळेच्या एका शिक्षकाची बडी दर्गा शाळेत नियुक्ती करण्यात आली. दोन शिक्षक मानधनावर घेण्यात यावे, अशा सूचना फरांदे यांनी शाळा प्रशासनाला दिले. तर, या दोघांना दोन महिन्यांचे मानधन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार मंगळवारी (दि. २०) या दोन्ही शिक्षकांना मानधन देण्यात अाले. यावेळी प्रशासनाधिकारी नितीन उपासनी, आदर्श मल्टिपर्पज ग्रुपचे उपाध्यक्ष असलम खान, मुख्याध्यापक आसिफ खान, गोपी पाटकरी, एजाज शेख आदी उपस्थित होते.

अाता पालिकेने बघावे
^याशाळेतील एका महिन्याचे मानधन मी दिले. दुसऱ्या महिन्यानंतर ही जबाबदारी पालिकेची अाहे. पालिकेने शिक्षक नेमणुकीसाठी प्रयत्न करावे. प्रा.देवयानी फरांदे, आमदार

प्रस्ताव दिला अाहे..
^पालिकेच्या मराठी,उर्दू शाळेत १८ मराठी शिक्षक आणि उर्दू शिक्षकांची मानधनावर नियुक्ती करावी, असा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला आहे. नितीनउपासनी, प्रशासनाधिकारी, मनपा
मंगळवारी (िद. २०) अामदार फरांदे यांनी दिले एक महिन्याचे मानधन.

कायम शिक्षक पाहिजे
^बडीदर्गा उर्दू शाळेत गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक नसल्याने गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा सुरूु अाहे. अाता दोन शिक्षक मानधनावर घेण्यात आलेले आहे. मात्र, दोन महिन्यांनंतर या शिक्षकांच्या मानधनाचे काय? हा प्रश्न कायम अाहे. मानधन नाही मिळाले तर शिक्षक राहणार का? म्हणूनच या शाळेसाठी कायम शिक्षक हवे. असलम बशीर खान, पालक

बातम्या आणखी आहेत...