आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन मुलीचे जुन्या नाशकात अपहरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक- शिकवणीवरून घरी जाणार्‍या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना भद्रकाली परिसरात रविवारी दुपारी घडली. या प्रकाराने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित इरफानच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलगी शिकवणीवरून घरी परतत असताना टाकळीरोडवरील त्रिकोणी गार्डन परिसरात गाडीतून (एम.एच.15 डी.सी.4546) आलेल्या इरफान नावाच्या युवकाने मुलीला बळजबरी गाडीत कोंबून जिवे मारण्याची धमकी देत तिचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या पित्याने भद्रकाली पोलिस ठाण्यात दिली. याबाबत भद्राकाली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अपहरणकर्त्याचा शोध घेत आहेत.