आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीचे अपहरण व अत्याचार; मुंबईतील तरुणास अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पाहुण्या आलेल्या एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष देत अपहरण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केलेल्या मुंबई येथील तरुणावर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास दिल्लीमध्ये अटक करण्यात आली.

माटुंगा (मुंबई ) येथील एक 16 वर्षीय मुलगी मखमलाबादरोडवरील एका नातेवाइकांच्या घरी 15 दिवसांपूर्वी पाहुणी आली होती. त्यावेळी माटुंगा येथील अजित ऊर्फ गुंजन बलजीत बागडी (वय 20) याने मुलीस लग्नाचे आमिष देत तिचे अपहरण करून तिला दिल्ली येथे नेले. या दरम्यान मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले. मुलीच्या नातेवाइकांनी पंचवटी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी अधिक तपास करत दिल्ली येथून मुलीसह बागडीला अटक केली.

मुलीच्या फिर्यादीवरून तरुणाच्या विरोधात अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आली.

खूनप्रकरणी आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई

सातपूर । अँड. मेघा जगताप यांच्या हत्येप्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून मध्यवर्ती कारागृहात असलेल्या तिघा संशयितांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता करताच सातपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. अशोकनगर परिसरातील विश्वासनगर येथे राहणार्‍या अँड. मेघा जगताप यांची 21 फेब्रुवारी रोजी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. सातपूर पोलिसांनी याप्रकरणी अर्जुन आव्हाड, जितेंद्र कुलथे व चेतन सावकार यांना अटक केली होती. वकिलाची हत्या झाल्याने जिल्हा न्यायालयातील वकिलांनी संशयितांचे वकीलपत्र घेण्यास नकार दिला होता. या संशयितांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली असून, त्यांची दोन दिवसांपूर्वीच मुक्तता करण्यात आली होती. सातपूर येथे वकील महिलेच्या खूनप्रकरणाने त्यावेळी खळबळ उडाली होती.