आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील तपमानात घट; थंडीची चाहूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पावसाचा मुख्य हंगाम संपल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर सुरूच असल्याने शहरातील तपमानात घट झाली आहे. शनिवारी नाशिक हवामान केंद्रात कमाल 28.4 आणि किमान 20.0 अंश सेल्सिअस अशी तपमानाची नोंद झाली. यावर्षी समाधानकारक पाऊस पडला असून, भूजल पातळीत वाढ झाली आहे. शहरवासीयांना आतापासूनच गारवा जाणवायला लागला आहे. 1 ऑक्टोबर रोजी कमाल तपमान हे 30.3 अंश सेल्सिअस होते. दहा दिवसांत तपमानाचा पारा घसरून ते 28.4 अंश सेल्सिअसपर्यंत आले आहे.